अहिल्याबाई होळकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:57+5:302021-06-01T04:12:57+5:30

ज‌‌ळगाव : शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्थांतर्फे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण ...

Greetings to Ahilyabai Holkar | अहिल्याबाई होळकरांना अभिवादन

अहिल्याबाई होळकरांना अभिवादन

ज‌‌ळगाव : शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्थांतर्फे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोनामुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करण्यात आली.

चांदसरकर विद्यालय

खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित गिरिजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर विद्यालयात मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाला भूषण अमृतकर व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

रिपाइं

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हाप्रमुख जे. डी. भालेराव यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय प्रमुख शरद धनगर, आण्णा अडकमोल, विजय पाटील, चंद्रकांत अहिरे, प्रवीण परदेशी, सिद्धार्थ गव्हाणे, प्रकाश सोनवणे, दीपक बिऱ्हाडे, अजित शेख, फिरोज पिंजारी, नरेंद्र सपकाळे, रवींद्र जाधव, निकीता सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Ahilyabai Holkar