बाबासाहेबांना घरूनच करा अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:17 IST2020-12-06T04:17:20+5:302020-12-06T04:17:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचे संकट असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरूनच अभिवादन करावे, ऑनलाईन ...

Greet Babasaheb from home | बाबासाहेबांना घरूनच करा अभिवादन

बाबासाहेबांना घरूनच करा अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचे संकट असल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरूनच अभिवादन करावे, ऑनलाईन कार्यक्रमांवर भर द्यावा, असे आवाहन मुकुंद सपकाळे यांनी बैठकीत केले आहे. छोट्या अभिवादन सभेच्या आयोजनानिमित्त अजिंठा विश्रामगृहात बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

रविवारी ६ डिसेंबर रोजी अतिशय कमी समाजबांधवांच्या उपस्थिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी ९ वाजता अभिवादन सभा होणार आहे. मात्र, या ठिकाणी गर्दी टाळावी व सर्व शासकीय नियम पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला प्रा. प्रीतीलाल पवार, हरिश्चंद्र सोनवणे, अमोल कोल्हे, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, संजय तांबे, दिलीप सपकाळे, कैलास मोरे, नाना मगरे, भारत सोनवणे, माजी नगरसेवक राजू मोरे, श्रीकांत मोरे, संजय बागुल, धर्मेश पालवे आदी उपस्थित होते.

Web Title: Greet Babasaheb from home