विवेकानंद स्कूलमध्ये ‘ग्रीन कलर डे’ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:35+5:302020-12-05T04:24:35+5:30
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम पूर्व-प्राथमिक विभागात ‘ग्रीन कलर डे’ ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. कार्यक्रम प्रमुख चारुशिला जोशी ...

विवेकानंद स्कूलमध्ये ‘ग्रीन कलर डे’ साजरा
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम पूर्व-प्राथमिक विभागात ‘ग्रीन कलर डे’ ऑनलाइन पद्धतीने साजरा झाला. कार्यक्रम प्रमुख चारुशिला जोशी यांनी हिरवा रंग, त्यांच्या रंगछटा याची ओळख करून दिली. मुलांनी वेगवेगळ्या हिरव्या वस्तू, खेळणी व बनविलेल्या कलाकृती सादर करून उत्तम प्रतिसाद दिला. तसेच मुलांनी व शिक्षकांनी हिरव्या रंगाची वेशभूषा करत ग्रीन कलर डे साजरा केला. कार्यक्रमाला प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील व समन्वयिका सविता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.