भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे शिक्षकांप्रति कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:18 IST2021-09-23T04:18:22+5:302021-09-23T04:18:22+5:30

या कार्यक्रमाला निंभोरा येथील डॉ. एस. डी. चौधरी, युवा परिषदेचे जिल्हा समन्वयक गिरीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रणित महाजन ...

Gratitude to the teachers from the Indian National Youth Council | भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे शिक्षकांप्रति कृतज्ञता

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे शिक्षकांप्रति कृतज्ञता

या कार्यक्रमाला निंभोरा येथील डॉ. एस. डी. चौधरी, युवा परिषदेचे जिल्हा समन्वयक गिरीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रणित महाजन आणि निळे निशाण संघटनेचे कुणाल महाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या शिक्षकांचा झाला सत्कार -

तालुक्यातील सेवानिवृत्त पी. के. चौधरी, दिलीप वैद्य, सुधाकर झोपे, दीपक सोनार, हर्षाली बेंडाळे, सायरा बानो तबिब खान, कल्पना पाटील, अरविंद महाजन, अरुण महाजन, शैलेश राणे, दीपक पाटील, जगदीश लोहार या शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा समन्वयक धनश्री विवेक ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे रावेर तालुकाध्यक्ष राज खाटीक, उपाध्यक्ष दीपेश भुसे, सचिव भाग्यश्री बाविस्कर, कोषाध्यक्ष संकेत बोरोले, सचिव अक्षय महाजन, हर्षा सरोदे, गौरव महाजन आणि अर्शद पिंजारी यांच्यासह तालुका समन्वयक गौरव काटोळे, चेतन पाटील, पवन महाजन, प्रेम चौधरी आणि खुशी कासार यांना यावेळी नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. पी. के. चौधरी, दीपक सोनार, कल्पना पाटील आणि दीपक पाटील या शिक्षकांनी सत्कारानंतर मनोगत व्यक्त केले. राज खाटीक यांनी सूत्रसंचालन केले तर दीपेश भुसे यांनी आभार मानले.

Web Title: Gratitude to the teachers from the Indian National Youth Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.