हाती आलेला घास हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:12 IST2019-11-05T21:12:07+5:302019-11-05T21:12:13+5:30
चोपडा तालुक्यातील वास्तव : पिकपेरा नोंदीनुसार भरपाई देण्याची मागणी

हाती आलेला घास हिरावला
चोपडा : तालुक्यात सततच्या अवकाळी पावसाने यावर्षी शेतकऱ्यांच्या हातातून हंगाम गेलेला आहे. जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यात यावर्षी जवळपास अकराशे मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद शासन दप्तरी झाली आहे. नोव्हेंबर सुरू झाला तरीही सततच्या पावसाने खरीप हंगामातील मूग, उडीद, मका, कापूस, तूर, सोयाबीन यासारखी पिके नेस्तनाबूत झाली आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी वाºयावर सुटला आहे. शेतक?्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून शासन स्तरावर तत्काळ मदत द्यावी अशी मागणी केलेली आहे. गेल्या महिना-दीड महिन्यापासून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व नेते, लोकप्रतिनिधी मश्गुल असताना व निकालानंतर दिवाळीचा सण सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. अवकाळी पावसाने शेतातील सर्व पिके सडून खराब झाली आहेत. एवढेच नाही तर जनावरांसाठी चाराही सडून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र सध्यातरी तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी तथा मंडळ अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडून संथ गतीने पंचनामे सुरू आहेत. शेतकरी चिंतेत असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे जाणवते.
यासोबतच नवनिर्वाचित आमदार व पक्षीय नेते हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री कोण होणार यात गुंतलेले आहेत. त्यांनाही शेतकºयांकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे दिसते आहे. गेल्या दहा वर्षात कधी नव्हे एवढा पाऊस यावर्षी झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता उशीर झाल्याने दुसरा रब्बी हंगामही हातून जाण्याची भीती तालुक्यातील शेतकरी वर्तवीत आहेत. याबाबत दखल घेऊन सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.