३४ गावांना ६२ लाखांचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:27+5:302021-07-10T04:13:27+5:30
पारोळा : तालुक्यात १५ व १६ मे रोजी तौक्ते चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले होते. तालुक्यात ३४ गावांमधील ४३९ शेतकऱ्यांना ...

३४ गावांना ६२ लाखांचे अनुदान
पारोळा : तालुक्यात १५ व १६ मे रोजी तौक्ते चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले होते. तालुक्यात ३४ गावांमधील ४३९ शेतकऱ्यांना एकूण ६१ लाख ८२ हजार रुपये नुकसान भरपाई अनुदान शासनाने मंजूर केली आहे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन दिवसात जमा करण्यात येणार आल्याची माहिती या विभागाचे लिपिक विठ्ठल वारकर यांनी दिली.
तालुक्यातील आडगाव, गडगाव, मुंदाणे प्र.उ., तरवाडे, अंबापिंप्री, बहादरपूर, चोरवड, शिरसोदे, जोगलखेडे, तरडी, सोके, मुंदाणे प्र.अ., पिंपळभैरव, शिरसमणी , तामसवाडी, हनुमंतखेडे, भाटपुरी , सावरखेडे, देवगाव, शिवरेदिगर, जिराळी, टोळी, पिंपरी प्र.उ., शेवगे प्र.ब., करमाड बु , रताळे, करमाड खु , कराडी, ढोली, बोळे, वेल्हाणे, पातरखेडे, वसंतवाडी , महाळपूर या गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
तालुक्यात बहुवार्षिक फळपिकांचे व आश्वासित सिंचन क्षेत्र एकूण ११९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. फळपिकांना हेक्टरी ५० हजार भरपाई नुकसान भरपाई मिळेल. त्यात लिंबू , मोसंबी, सीताफळ, पेरू या पिकांचा समावेश आहे. तर आश्वासित सिंचन क्षेत्राअंतर्गत केळी, पपई, ऊस आदी कोरड वाहू क्षेत्रातील पिकांना हेक्टरी १३,५०० रुपयांचे अनुदान देण्यात आले.
कोट
मे महिन्यात झालेल्या वादळात तालुक्यात ४३९ शेतकऱ्यांचे फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. त्यात ६२ लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून तहसील यांचेकडे जमा झाले आहे. मंगळवारपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाई ही जमा होईल. - अनिल गवांदे, तहसीलदार पारोळा.
अनुदानाची प्रतीक्षा लागून आहे
वादळात परिसरातील फळबाग शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले होते. मंगळवारी खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्ष खात्यावर अनुदान जमा झाल्यावरच समाधान मिळेल. - अनिल भानुदास कुलकर्णी, तामसवाडी, ता. पारोळा
अनुदान अद्याप खात्यावर जमा नाही
या वादळात शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले खूप कष्टाने उभा केलेला फळबाग वादळात क्षणात होत्याचे नव्हते झाले.नुकसानीचे अनुदान प्राप्त झाल्यास बियाणे,खते घेण्यासाठी कमी येतील कर्ज काढण्याची गरज राहणार नाही. - संभाजी नामदेव पाटील, दळवेल, ता. पारोळा