शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

माहिती न दिल्यामुळे ग्रामसेवकास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 6:57 PM

चाळीसगाव: माहिती आयोग खंडपीठाचा आदेश

चाळीसगाव : माहितीच्या अधिकारात विचारलेली माहिती पुरविली नाही म्हणून उपखेड ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व जनमाहिती अधिकारी चंद्रकांत मुरलीधर मराठे यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची कार्यवाही करण्याचा आदेश राज्य माहिती आयोगाचे नाशिक खंडपीठ आयुक्त बिश्नोई यांनी दिला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद प्रल्हाद पाटील (रा.उपखेड ता.चाळीसगाव) यांनी उपखेड ग्रामपंचायतीच्या बाबतीत माहितीचा अधिकार अन्वये तत्कालीन ग्रामवसेवक तथा जनमाहिती अधिकारी चंद्रकांत मराठे यांना माहिती विचारली होती. ही माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळा केली होती. म्हणून पाटील यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांचेकडे तक्रार केली होती. त्यांनी अपिलार्थी विनोद पाटील यांना माहिती देण्यास ग्रामसेवक यांना सांगितले होते. त्यानंतरही ग्रामसेवक मराठे यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून पाटील यांनी माहिती आयोग नाशिक खंडपीठाकडे अपिल दाखल केले होते. आयोगाने ग्रामसेवक चंद्रकांत मराठे यांचे म्हणणे अमान्य करुन त्यांच्यावर अधिनियमातील कलम २० (१) नुसार त्यांच्यावर एक हजार रुपये दंडाची (शास्तीची) कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे. ही रक्कम ग्रामसेवक मराठे यांच्या वेतनातून कपात करुन त्याबाबतची माहिती आयोगाला कळविण्या बाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.