Gramsevak's agitation in Chopda | चोपडा येथे ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन
चोपडा येथे ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन


चोपडा : विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांच्या येथील युनियनने कामबंद आंदोलन सुरू करीत ग्रामपंचायतींच्या चाव्या मुख्यालयात जमा केल्या.
२२ रोजी सकाळी १० वाजता चोपडा ग्रामसेवक युनियन अध्यक्ष नंदकुमार सोनवणे, सचिव कैलास पाटील यांच्यासह कामबंद आंदोलनात सहभागी सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी जितेंद्र पाटील यांचेकडे चाव्या सुपूर्त केल्या. या आंदोलनामुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधून ग्रामस्थांना दाखले मिळत नसल्याने गैरसोय होत आहे.


Web Title: Gramsevak's agitation in Chopda
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.