लोकशाहीची मूल्ये जोपासत शिंदाडची ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:56+5:302021-09-06T04:19:56+5:30

कोरोनाच्या निर्बंधांतून काहीशी सवलत मिळताच नवनिर्वाचित सत्ताधाऱ्यांनी पहिलीच महिला ग्रामसभा व जनरल ग्रामसभा उपसरपंच नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली. ...

Gram Sabha of Shindad while upholding the values of democracy | लोकशाहीची मूल्ये जोपासत शिंदाडची ग्रामसभा

लोकशाहीची मूल्ये जोपासत शिंदाडची ग्रामसभा

कोरोनाच्या निर्बंधांतून काहीशी सवलत मिळताच नवनिर्वाचित सत्ताधाऱ्यांनी पहिलीच महिला ग्रामसभा व जनरल ग्रामसभा उपसरपंच नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली. या ग्रामसभेला महिलांची व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रामस्थांनी बऱ्याच कालावधीनंतर मनमोकळ्या समस्या ग्रामसंसदेसमोर मांडल्या. यावेळी काहीअंशी गोंधळाचे वातावरण झाले. मात्र, सदस्यांनी शंकांचे निरसन करून ग्रामस्थांचे समाधान केले.

सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने पाळून कामकाजाला गती दिली जाईल, असे आश्वासन दिले. गावातील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा नेहमीप्रमाणे सुरू कराव्यात, असा ठराव पारित झाला. ग्रामपंचायतीच्या सुरू असलेल्या कामकाजाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून एकमताने हिलाल रामदास पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले.

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी ननावरे, ग्रा. पं. सदस्य संदीप सराफ, माजी सरपंच कैलास पाटील, हिलाल पाटील, ग्रा. पं. सदस्य विलास पाटील, स्वप्नील पाटील, समाधान पाटील, इंदल परदेशी, धनराज पाटील, श्रीराम धनगर, अकिल तडवी यांची उपस्थिती होती.

Web Title: Gram Sabha of Shindad while upholding the values of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.