ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जही स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:21 IST2020-12-30T04:21:43+5:302020-12-30T04:21:43+5:30

जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य ...

The Gram Panchayat will also accept offline applications for elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जही स्वीकारणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जही स्वीकारणार

जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीने (ऑफलाइन) स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळही ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढवून दिली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशन दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. ३० डिसेंबर अशी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करताना २८ डिसेंबर रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी, तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने वरील निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

Web Title: The Gram Panchayat will also accept offline applications for elections