ग्रामपंचायत निवडणुकीत भरली रंगत

By Admin | Updated: October 26, 2015 00:09 IST2015-10-26T00:09:10+5:302015-10-26T00:09:10+5:30

राजकीयदृष्टया महत्त्वाच्या आणि तालुक्यातील राजकारणाला कलाटणी देणा:या 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये चांगलाच रंग भरला आहे.

Gram panchayat full color in elections | ग्रामपंचायत निवडणुकीत भरली रंगत

ग्रामपंचायत निवडणुकीत भरली रंगत

नंदुरबार : राजकीयदृष्टया महत्त्वाच्या आणि तालुक्यातील राजकारणाला कलाटणी देणा:या 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये चांगलाच रंग भरला आहे. प्रचाराचे अवघे दोन दिवस उरल्याने घरोघरी मतदारांच्या भेटीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या वादातून अनेक ठिकाणी आपसात हमरीतुमरी आणि हाणामारीही होत आहेत. आतार्पयत तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील अनेक ग्रामपंचायती तालुक्यातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. या गावांवरच तालुक्याच्या राजकारणाचा दोलकदेखील फिरत असतो. अशा ग्रामपंचायतींपैकी खोंडामळी, शनिमांडळ, मांजरे, भालेर, विखरण, हाटमोहिदा, वैंदाणे यासह इतर 21 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. पैकी बलदाणे ग्रामपंचायत माघारीच्या वेळी बिनविरोध झाली. 21 जागांसाठी चुरशीत निवडणूक सुरू आहे.

राजकारण दोलायमान

नंदुरबार तालुक्यात आमदार डॉ.विजयकुमार गावीत गट आणि काँग्रेस यांच्यातच राजकारणातील वर्चस्वाची चढाओढ असते. अगदी सोसायटी, ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते थेट विधानसभा निवडणुकीर्पयत ही चुरस असते. त्याची झलक ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून येत आहे. राजकारणातील दोन घरोब्यांमुळे गावागावात नाते-गोते, कुटुंबांमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत. भाऊ-भाऊ, काका-पुतणे अशा लढती अनेक ग्रामपंचायतींमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. वरिष्ठ राजकीय नेते प्रत्यक्ष या निवडणुकीत सहभागी होत नसले तरी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच व्यूहरचना केली जात आहे. त्यासाठी संबंधित गावांचे पॅनलप्रमुख व राजकीय नेते नंदुरबारात येऊन खल करीत आहेत.

वादविवाद आणि हाणामारी

सर्वच ग्रामपंचायतींमध्ये चुरस आणि रंगतदार लढती असल्यामुळे वादविवाद आणि भांडणे होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीदेखील मोठी कसरत होत आहे. खर्देखुर्द ग्रामपंचायतीत मत कुणाला देणार या वादातून दोन गटात हाणामारी झाली. एका गटाने हाणामारीची फिर्याद दिली तर दुस:या गटाने अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण आणि प्रचार कुठल्या पातळीवर पोहचला आहे हे लक्षात येते.

प्रचार शिगेला

निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. अवघे दोन दिवस प्रचाराचे शिल्लक आहेत. बुधवार, 28 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी घरोघरी भेटीला अधिक प्राधान्य दिले जात आहे. जे मतदार बाहेरगावी आहेत त्यांना आणण्यासाठी संपर्क साधण्यात आला असून सोमवारी वाहने पाठविली जाणार आहेत. मोठय़ा ग्रामपंचायतींमध्ये चुरस असल्याने अशा ठिकाणी एकएका मताची उमेदवारांना गरज आहे. त्यादृष्टीनेदेखील नियोजन करण्यात येत आहे. बुधवारी जास्तीत जास्त मतदान आपल्याला मिळावे यासाठी प्रत्येक उमेदवाराची कसरत आहे. असे असले तरी नातेगोते, जात आणि एकूणच पक्षाचाही विचार केला जाणार आहे.

प्रशासनाची तयारी

निवडणुकीसाठी प्रशासनानेदेखील तयारी केली आहे. निवडणूक होणा:या गावांमध्ये मतदान केंद्र तयार करणे, कर्मचा:यांची नियुक्ती व प्रशिक्षण यासह इतर तयारीला वेग देण्यात आला आहे. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार, सहा. अधिकारी रामजी राठोड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रय}शील आहेत. 28 रोजी मतदान झाल्यानंतर लागलीच दुस:या दिवशी अर्थात 29 रोजी मतमोजणी आहे. त्यामुळे गुरुवार, 29 रोजी दुपार्पयत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: Gram panchayat full color in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.