जंगीपुराच्या चोरटय़ाकडून 13 दुचाकी हस्तगत

By Admin | Updated: June 28, 2017 11:52 IST2017-06-28T11:52:14+5:302017-06-28T11:52:14+5:30

स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी. धुळे, औरंगाबाद येथून चोरल्या दुचाकी

Grab 13 bikes from Jangipur's thieves | जंगीपुराच्या चोरटय़ाकडून 13 दुचाकी हस्तगत

जंगीपुराच्या चोरटय़ाकडून 13 दुचाकी हस्तगत

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.28 - दुचाकी चोरणा:या गणेश बाबुलाल परदेशी (रा.जंगीपुरा, ता.जामनेर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी शेंदुर्णी येथे चोरीच्या दुचाकीसह पकडले. चौकशी केली असता त्याच्याकडून 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या. 
अधिक चौकशीत त्याने शांताराम सुपडू शेनफडू (रा.पुनगाव, ता.पाचोरा) याच्यासोबत धरणगाव, बोदवड, जामनेर, रावेर,धुळे व औरंगाबाद शहरातून 13 दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी या 13 दुचाकी हस्तगत करुन गणेश याला नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. शांताराम हा फरार झालेला आहे.
कारवाईसाठी खास पथक..
कारवाईसाठी खास पथक नियुक्त केले होते.  त्यात साहायक फौजदार उत्तमसिंग पाटील, सुरेश पवार, सुभाष पाटील, नीळकंठ पाटील, मंगलसिंग पाटील, अशोक चौधरी, बापू पाटील, ईश्वर सोनवणे, गफुर तडवी, इद्रीस पठाण व दर्शन ढाकणे यांनी ही कारवाई केली. सापडलेल्या चोरीच्या दुचाकीची किमत 2 लाख 60 हजार रुपये आहे. 

Web Title: Grab 13 bikes from Jangipur's thieves