मंगरूळ जि.प. शाळेची जुनी इमारत बनली धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 20:30 IST2019-09-10T20:30:30+5:302019-09-10T20:30:37+5:30
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेची जुनी मजबूत इमारत कौल व छत मोडकळीस आल्याने धोकादायक ठरली ...

मंगरूळ जि.प. शाळेची जुनी इमारत बनली धोकादायक
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्रथमिक शाळेची जुनी मजबूत इमारत कौल व छत मोडकळीस आल्याने धोकादायक ठरली आहे.
या जुन्या इमारतीत शाळा भरत नसली तरी मुले येथे खेळतात. यामुळे प्राथमिक शाळेच्या लहान मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो. येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला पुरेशी इमारत असल्याने जुनी इमारत रिकामी पडली आहे. या इमारतीचे बांधकाम पक्के आहे. मात्र फक्त छताची कौले तुटली असल्याने या इमारतीत शाळा भरत नाही. मात्र, कोणत्याही क्षणी लहान मुलांच्या डोक्यावर कौल पडून किरकोळ अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर पत्र्याचे शेड बसविले तरी या इमारतीचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.