शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. चे प्रमुख विभाग प्रभारींच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 14:05 IST

बाहेरून अधिकारी येईनात : रिक्त जागांचा प्रश्न

जळगाव : राजकीय व प्रशासकीय संघर्षाची नवी ओळख होत असलेल्या जिल्हा परिषदेत गेल्या कित्येक महिन्यांपासून महत्त्वाच्या विभागांचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे़ बाहेरून अधिकारीच यायला तयार नसल्याने रिक्त जागांचा प्रश्न गंभीर बनला आहे़जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून येवले यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे़ अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त आहे़ शिक्षण विभागाचा गेल्या चार महिन्यांपासून डॉ़ डिगंबर देवांग यांच्याकडे प्रभारी पदभार आहे़ यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कॅफो गायकवाड हे पदभार सांभाळत आहे़ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊनही ते पदभार घेण्यास तयार नसल्याने डॉ़ दिलीप पोटोडे हे गेल्या महिनाभरापासून प्रभारी म्हणूनच आरोग्य विभागाचा कारभार सांभाळत आहे़ महत्त्वाच्या विभागांना कायस्वरूपी अधिकारी नसल्याने अनेक महत्त्वाच्या कामांना अडचणी निर्माण होत आहे, शिवाय अधिकाºयांच्या बदल्या झाल्यानंतर प्रलंबित महत्त्वाचे काही निर्णय घेण्याास प्रभारी अधिकाºयांना विलंब तर होतोच शिवाय मोठ्या अडचणीतून पुन्हा नवीन निर्णय प्रक्रिया राबवावी लागत असल्याचे चित्र आहे़पदभार सोडतात तत्काळ, घ्यायला मात्र कोणी तयारजिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ कमलापूरकर यांची रत्नागिरी येथे बदली झाली़ आठ दिवसात त्यांनी पदभार सोडला मात्र पंचवीस दिवस उलटले नवे जिल्हाधिकारी आलेले नाहीत़ डेप्युटी सीईओ राजन पाटील यांची नाशिक येथे बदली झाली त्यांनी दुसºयाच दिवशी पदभार सोडला़ डेप्युटी सीईओ भाऊसाहेब अकलाडे यांच्याजागेवर सिंधुदुर्ग येथील के़ बी़ रणदिवे यांची नियुक्ती झाली आहे, आठवडा उलटला मात्र ते आलेले नाहीत़ अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांचे पद डिसेंबरपर्यंततरी प्रभारी गायकवाड यांच्याकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ दुसरीकडे शिक्षण विभागाला अधिकारी मिळत नाही़ या बाबीमुळे शासकीय कामकाजावर परिणाम जाणवणार असल्याचे बोलले जात आहे़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव