G.P. During the election, he was beaten by the opposition | ग्रा.पं. निवडणुकीवेळी विरोधी गटाकडून फिरल्याने मारहाण

ग्रा.पं. निवडणुकीवेळी विरोधी गटाकडून फिरल्याने मारहाण

जळगाव : ग्रा.पं. निवडणुकीच्या वेळी विरोधी गटाकडून फिरला तसेच जुन्या गुन्ह्यात साक्षीदार असल्याचे वाईट वाटून गणेश दगडू धुमाळ यांना मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. चिंचोली येथे रविवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना झाली.

या प्रकरणी रघुनाथ पालवे, विशाल पालवे, अमोल पालवे, प्रवीण जनार्दन धुमाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

मिरचीपूड टाकून लुटणाऱ्या गुन्हेगाराला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वाहनधारकांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांना लुटणाऱ्या अजय सुदाम भिल (२०, रा. उमाळा) या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. अजय हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या जिगर बोंडारे या सराईत गुन्हेगाराच्या टोळीचा सदस्य आहे. त्यांच्यासोबत गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली आहे.

Web Title: G.P. During the election, he was beaten by the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.