रोटरी क्लबला प्रांतपालांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:15 IST2021-05-22T04:15:40+5:302021-05-22T04:15:40+5:30
रोटरी क्लब जळगावने सामाजिक प्रकल्प व कार्यक्रमासाठी रोटरी फाउंडेशनला दिलेली तीन लाख रुपयांची देणगी मोलाची आहे, असे सांगत शब्बीर ...

रोटरी क्लबला प्रांतपालांची भेट
रोटरी क्लब जळगावने सामाजिक प्रकल्प व कार्यक्रमासाठी रोटरी फाउंडेशनला दिलेली तीन लाख रुपयांची देणगी मोलाची आहे, असे सांगत शब्बीर शाकीर यांनी रोटरी क्लबच्या कामाचे कौतुक केले. यावेळी पराग पाटील यांना रोटरीचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले.
जितेंद्र ढाके यांनी रोटरी वर्ष २०२०-२१ मधील कार्यक्रम व प्रकल्पाची माहिती सादरीकरणातून देऊन मनोगत व्यक्त केले. प्रांतपालांचा परिचय सहप्रांतपाल गुजराथी यांनी करुन दिला. मृण्मयी कुळकर्णी हिने गणेश वंदना सादर केली. सूत्रसंचालन गिरीश कुळकर्णी यांनी केले तर संदीप शर्मा यांनी आभार मानले.
पहिल्या सत्रात प्रांतपाल शब्बीर शाकीर, डिस्ट्रिक्ट सचिव टॉभी भगवागर, पूनम गुजराथी, जितेंद्र ढाके, डॉ. काजल फिरके, किशोर मंडोरा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर झालेल्या क्लब अब्सेंलीमध्ये १८ कमिटी चेअरमनने प्रांतपालांना संपूर्ण वर्षभरात केलेल्या कामांचा अहवाल सादर केला.
कार्यक्रमास माजी प्रांतपाल संग्रामसिंग राजे भोसले, डॉ. चंद्रशेखर सिकची, राजेंद्र भामरे आदी मान्यवरांसह क्लबचे माजी अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.