धनगर समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:34+5:302021-07-07T04:21:34+5:30
चाळीसगाव : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याची मागणी नगर ऐक्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे केली. ...

धनगर समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधावे
चाळीसगाव : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याची मागणी नगर ऐक्य अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे केली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी धनगर समाजाच्या इतर प्रश्नांबाबतही आ. चव्हाण यांच्याशी चर्चा केली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, जे आदिवासींना तेच धनगरांना या न्यायानुसार मागील वर्षाचे एक हजार व चालू वर्षाचेही एक हजार कोटी असे एकूण दोन हजार कोटी उपलब्ध करून द्यावे. याबरोबरच प्रत्येक मतदार संघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसह राजे यशवंतराव होळकरांचेही भव्यदिव्य असे स्मारक उभारावे. चाळीसगाव शहरातील पाटणादेवी रस्त्यावर असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्यात यावे.
धनगर ऐक्य अभियानाचे राज्य समन्वयक डॉ. शशिकांत तरंगे यांच्या आवाहनानुसार हे निवेदन देण्यात आले.
यावेळी धनगर प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष प्रा. विजय शिरसाठ, धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष साहेबराव आगोणे, वाघळीचे सरपंच सुनील हाडपे, धर्मा बच्छाव, स्वप्नील वैदकर, योगेश साबळे, धनंजय बोरसे, सागर आगोणे, अतुल हाडपे, अनिल हडपे, अप्पासाहेब देवरे यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते.