बोदवडला शासकीय कार्यालये ‘वा:यावर’
By Admin | Updated: December 29, 2015 00:25 IST2015-12-29T00:25:08+5:302015-12-29T00:25:08+5:30
रिक्त पदाचा वनवास संपण्याचे नाव घेत नसल्यामुळे शासकीय कार्यालय वा:यावर आहे.

बोदवडला शासकीय कार्यालये ‘वा:यावर’
बोदवड : एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीप्रमाणे अगोदरच तालुक्याची स्थिती आहे. त्यात शासकीय अधिका:यांच्या रिक्त पदाचा वनवास संपण्याचे नाव घेत नसल्यामुळे शासकीय कार्यालय वा:यावर आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयांची गाडी रुळावर आणण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नसल्याची स्थिती आहे. येथे तालुका आरोग्य अधिकारीपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपद बारा वर्षापासून रिक्त आहे. शिवाय वैद्यकीय अधिका:यांची दोन पदे दोन वर्षापासून रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालय बंद असल्यासारखीच स्थिती आहे. बोदवड, नाडगाव येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण देणारी संस्था (आयटीआय) आहे. तेथील प्राचार्यपद ही गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहे. पूर्वी प्रभारी म्हणून प्रा.राठोड हे काम पाहत होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी, उद्योग, शिक्षण विस्तार अधिकारी, वाहनचालक अशी 14 पदे रिक्त आहेत. जि.प. शाळांमधील शिक्षकांची 30 व आठ ग्रामसेवक अशी 52 पदे पं.स.त रिक्त आहेत. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र, येवती व एणगाव येथील आरोग्य अधिका:यांचीपदे रिक्त आहेत. तालुका पशुधन अधिकारी, पशुधन विकास अधिकारी ही पदे तीन ते चार वर्षापासून रिक्त आहेत. हीच परिस्थिती तहसीलदार कार्यालयाची आहे. तीन नायब तहसीलदार, एक पुरवठा निरीक्षक, तलाठय़ांची चार पदे हे तीन वर्षापासून रिक्त आहेत. पोलीस ठाणे ही रिक्त पदातून सुटले नाही. दोन पोलीस उपनिरीक्षक सोबत नऊ पोलीस कर्मचा:यांची पदे रिक्त आहेत. त्यात गोपनीय पोलिसांचादेखील समावेश आहे. वीज कंपनीही वा:यावर वीज वितरण कंपनीचे कार्यकारी उपअभियंता एक पद गत वर्षभरापासून रिक्त आहे. ग्रामीण सहायक उपअभियंता शहर सहायक उपअभियंता अशी चार पदे वीज कंपनीची रिक्त आहेत. 17 तंत्रज्ञांची पदे रिक्त, सहायक कनिष्ठ पदे रिक्त आहे. बोदवडसह तालुक्यासाठी 27 ग्रामसेवक पदे मंजूर आहेत. त्यातील आठ पदे रिक्त आहेत. आरोग्य, प्रशासन, सुरक्षा, वीज वितरण व शासकीय सेवा देणा:या सर्वच शासकीय कार्यालयात रिक्त पदांमुळे ठणठणाट आहे. काही अधिकारी ग्रामीण भाग असल्यामुळे येथे राहण्याची व प्रवासाची सुविधा नसल्यामुळे बोदवडला बदलीच्या नावाने नाक मुरडतात. त्यामुळे डझनभर अधिकारी व शेकडो कर्मचा:यांची पदे रिक्त आहेत. वीज कंपनीत एकूण 39 पदे रिक्त आहेत. पंचायत समितीत 54 पदे दोन्ही विभागात रिक्त पदे जास्त आहेत. या पदांना भरण्यासाठी कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे नागरिकांना सेवा देण्यास वेठीस धरले जात आहे. (वार्ताहर)