शासकीय मका, ज्वारी खरेदीस अत्यल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:55+5:302020-12-05T04:24:55+5:30
हमीभाव धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र हे केंद्र अमळनेर शेतकी संघामार्फत ...

शासकीय मका, ज्वारी खरेदीस अत्यल्प प्रतिसाद
हमीभाव धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मात्र हे केंद्र अमळनेर शेतकी संघामार्फत धरणगाव तालुक्यात मार्केट मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. याठिकाणी आतापर्यंत १९८६ क्विंटल मका खरेदी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्वारी २८ क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे .
आतापर्यंत या ठिकाणी बावन्न शेतकऱ्यांनी मका मोजणीला प्रतिसाद दिलेला आहे; मात्र ज्वारीला अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. दोन शेतकऱ्यांनी २८ क्विंटल ज्वारी शेतकी संघामार्फत मक्याला आठशे पन्नास रुपये भाव मोजला जात आहे तर ज्वारी सव्वीसशे रुपये क्विंटल दिली जात आहे; मात्र या मोजणी ठिकाणी ज्वारी देण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली दिसून येत आहे. हे खरेदी केंद्र धरणगाव मार्केट कमिटी या ठिकाणी सुरू असून अमळनेर शेतकी संघामार्फत सुरू करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी नोंदणी करून प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.३१ डिसेंबरपर्यंतही खरेदी सुरू राहणार आहे.