धरणगावात शासकीय ज्वारी, गहू व मका खरेदीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:53+5:302021-06-16T04:22:53+5:30
धरणगाव : महाराष्ट्र शासन आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२१ खरेदीअंतर्गत ज्वारी, गहू, मका, उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी ...

धरणगावात शासकीय ज्वारी, गहू व मका खरेदीचा शुभारंभ
धरणगाव : महाराष्ट्र शासन आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२१ खरेदीअंतर्गत ज्वारी, गहू, मका, उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी शासकीय खरेदीसाठी नावनोंदणी केली होती. सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, धरणगाव आवारात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत खरेदीचे उद्घाटन झाले.
चेअरमन प्रा. एन. डी. पाटील, सहकारी फ्रूट सेल सोसायटी पाळधी साहेबराव पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी मानले. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, निबंधक बारी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चंदन पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, धानोरा येथील सरपंच भगवान महाजन, डॉ. विलास चव्हाण, नवनाथ तायडे, शालिक पाटील, बाळू पाटील व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्या क्रमांकाच्या तीन शेतकऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी धरणगाव तालुक्यातून शासनाने दोन हजार क्विंटल ज्वारी व ६५०० क्विंटल मका मोजण्याची परवानगी दिली असल्याचे सांगितले. त्यात ज्वारीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी जास्त असल्याने, मागणी वाढवून मिळावी, असे आवाहन पालकमंत्र्यांना केले. याप्रसंगी शेतकरी कृती समितीचे गोपाल पाटील यांनी शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा, असे निवेदन दिले.
फोटोकॅप्शन: शासकीय ज्वारी, गहू, मका खरेदीचे उद्घाटन करताना पालकमंत्री, सोबत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी. फोटो आर. डी. महाजन. १६सीडीजे ३