शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अगरबत्ती व सुगंधीत वस्तूंच्या आयातीवर सरकारने घातले निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 12:34 IST

चीन व व्हिएतनामधून होणारी आयात १० वर्षात १५ पटीने वाढली

- विजयकुमार सैतवाल

जळगाव : विदेशातून मोठ्या प्रमाणात अगरबत्ती व सुगंधीत घटक पदार्थांची आवक वाढून स्थानिक रोजगारावर त्याचा परिणाम होऊ लागल्याने या आयातीला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने अगरबत्ती व सुगंधीत घटक पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घातले आहे. चीन व व्हिएतन या देशामधून होणारी ही आयात गेल्या १० वर्षांत १५ पटीने वाढल्याने या दोन्ही देशांमधून होणाऱ्या आयातीवर सरकारची करडी नजर राहणार आहे.घर, मंदिर किंवा दर्गा असो की कोणच्याही धार्मिक विधीसाठी भक्तीभावाने लावल्या जाण्याºया तसेच कोणतेही कार्यालय, दुकान या ठिकाणी वातावरण प्रसन्न करणाºया अगरबत्तीला धार्मिकता जपणाºया आपल्या भारत देशात मोठी मागणी आहे. त्यामुळेच देशात सुरुवातीपासून अगरबत्तीद्वारे कुटीर उद्योग आकाराला आले. त्यानंतर मोठ्या कंपन्या उदयास येण्यासह विदेशातूनही अगरबत्तीची आयात होऊ लागली.१० वर्षात आयात १५ पटीने वाढलीभारतात अगरबत्तीची मागणी पाहता दक्षिण भारतातील बंगलुरू पाठोपोठ अहमदाबाद, इंदूर, महाराष्ट्रात पुणे, नागपूर येथे मोठ्या कंपन्या सुरु झाल्या. साधारण २००८पर्यंत विदेशातून अगरबत्तीची जास्त आयात होत नव्हती. मात्र भारतात अगरबत्तीची मागणी वाढतच जात असल्याने इतर देशातून आयात होऊ लागली. यामध्ये चीन व व्हिएतनाम या देशांमधून सर्वाधिक आयात होऊ लागली. यामध्ये २००८मध्ये चीन व व्हिएतनाममधून अनुक्रमे २५५ व ११४ किलो, २००९मध्ये १२९ व ७४, २०१०मध्ये १११ व ९१८, २०११मध्ये २४० व १८४९, २०१२मध्ये ८२७ व ४५४४, २०१३मध्ये १४१३ व ७०७१, २०१४मध्ये ५०७३ व १० हजार ४१९, २०१५मध्ये १२ हजार ५१६ व १० हजार ८०९, २०१६मध्ये १८ हजार ५१७ व १० हजार ५८२, २०१७मध्ये २७ हजार ९ व १५६० आणि २०१८मध्ये ३० हजार १०६ व ४९६ किलो अगरबत्तीची आयात झाली.बेरोजगारी वाढलीविदेशातून अगरबत्तीच्या वाढत्या आयातीमुळे देशातील स्थानिक रोजगारावर परिणाम होऊ लागली. अगरबत्तीचे कुटीर उद्योगांची तर बिकट स्थिती झाली. त्यामुळे ही वाढती बेरोजगारी पाहता विदेशातून येणाºया अगरबत्तीवर निर्बंध घालण्याचा निर्णय सरकारने घेतला.परवाना घेण्यासह आयात मालाची द्यावी लागणार माहितीकेंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार अगरबत्ती आणि इतर सुगंधित पदार्थांच्या आयाती संदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. यात मुक्त आयात धोरण संपविले असून या पदार्थांच्या आयातीसाठी संबंधितांना चीन आणि व्हिएतनामसहीत इतरही देशांमधून वेगळा परवाना घ्यावा लागणार आहे. इतकेच नव्हे या नवीन कायद्यानुसार धूप, ‘रूम फ्रेशनर’ आणि सुगंधित उत्पादनांसाठीही हे नियम लागू राहणार आहे. सोबतच उत्पादक अथवा विक्रेत्यांना विदेशातून किती माल आयात केला याची माहिती संबंधित मंत्रालयाला सादर करावी लागणार आहे.सध्या चीनमधून फॅन्सी अगरबत्तीची जास्त आयात होऊ लागल्याने स्थानिक अगरबत्तींची मागणी घटल्याचेही उत्पादकांनी सांगितले.रोजगारवाढीस चालणा मिळणारसरकारच्या या निर्णयाने देशातील अगरबत्ती उत्पादकांना आपले उत्पादन वाढीस आता वाव मिळणार आहे. जे कुटीर उद्योग लयास गेले होते, त्यांना पुनरुज्जीवन मिळू शकले व अगरबत्ती उत्पादक कंपन्याही रोजगार देऊ शकले, असे अगरबत्ती उत्पादकांनी सांगितले.दोन टक्क्याने भाव वाढ वाढणारअगरबत्ती व कच्च्या मालाची आयात बंद झाल्याने मागणी व पुरवठ्याची गणित पाहता अगरबत्तीचे भाव वाढणार आहे. मात्र ही वाढ जास्त राहणार नाही तर ती केवळ २ टक्के वाढीपर्यंतच जाऊ शकतात, असे उत्पादकांनी सांगितले. यात भाववाढीपेक्षा आज रोजगार वाढीला अधिक प्राधान्य असल्याने सरकारने हे पाऊल उचलले असल्याचेही सांगितले जात आहे.स्थानिक अगरबत्ती उत्पादन घटून बेरोजगारीही वाढत असल्याने सरकारने अगरबत्ती व सुगंधित पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घातले आहे. सरकारच्या या निर्णयाने स्थानिक उत्पादन वाढून रोजगारवाढीसही चालणा मिळणार आहे.- राकेश पटेल, अगरबत्ती उत्पादक, अहमदाबाद.अगरबत्ती व सुगंधित पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घातल्याने आता सर्वांना परवाना घ्यावा लागणार आहे. या निर्णयाने भाववाढ होणार असली तरी जास्त राहणार नाही. मात्र यामुळे स्थानिक माल विक्रीस वाव मिळणार आहे.- ललित बरडिया, अगरबत्ती विक्रेते, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव