शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी निधीवर ‘डॉक्टरी बाबूंचा’ डल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:28 IST

चौकशी समिती गठीत : रावेर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

जळगाव : सरकारी वेतन घेऊन खासगी रुग्णालयात प्रसुती आणि भूलच्या निधीवर कंत्राटी डॉक्टरांनी सरकारी निधीवर डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. रुग्णालय अधीक्षक, स्त्री रोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाचजणांची समिती गठीत करण्यात आली आहे.रावेर ग्रामीण रुग्णालयात राष्टÑीय ग्रामीण अभियानांतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञ (पूर्ण वेळ) तर भूलतज्ज्ञ (आॅनकॉल) या पध्दतीने २०१८ मध्ये डॉ. उदय पाटील (रा.बोदवड) तर १८ जानेवारी ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत डॉ. नीलेश श्रीराम पाटील (रा.रावेर) यांची नियुक्ती करण्यात आली होती.भूलतज्ज्ञ डॉक्टरांना सेवेसाठी प्रत्येक सिझेरीयन प्रसुती (सर्जरी)साठी ४ हजार रुपये शासनाकडून देण्यात येतात. डॉ. उदय पाटील यांनी त्यांच्या काळात कधीच सेवा दिलेली नसताना त्यांच्या नावावर ७० सिझेरीयन दाखवून प्रति ४ हजार रुपये प्रमाणे पेमेंट त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आले. प्रत्यक्षात भूल देण्याचे काम डॉ. नीलेश पाटील यांनी केले आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रसुती सरकारी रुग्णालयात करणे अपेक्षित असताना खासगी रुग्णालयात झाल्या आहेत.नियमानुसार एखाद्या रुग्णाची सिझेरीयन प्रसुती वेळेस तपासणी रेकॉर्डवर बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकिय अधिकारी व भूलतज्ज्ञ यांनी तपासणीबाबत नोंद करणे बंधनकारक असताना ग्रामीण रुग्णालयात याची कोणतीही नोंद नाही.दिनेश कडू भोळे यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती उपलब्ध करुन त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यानिधी तक्रार केली आहे. दरम्यान, याबाबत डॉ. उदय पाटील यांना विचारणा केली असता आपली नियुक्ती झालेली असली तरी प्रसुतीवेळी वेळेत पोहचणे शक्य नव्हते, त्याकाळात रुग्णाच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून डॉ. नीलेश पाटील यांनी ही प्रक्रिया केलेली आहे.आपत्कालीन परिस्थितीत असे करता येते असेही त्यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर चौकशीसाठी पाचजणांची समिती गठीत करण्यात आली आहे. सरकारी निधीचा खरोखर दुरुपयोग झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर संबंधित डॉक्टरांकडून ही रक्कम वसूल केली जाईल. अजून चौकशी सुरु आहे. लवकरात लवकर अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सकचौकशी समितीचा फार्सया प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. तासखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आतापर्यंत फक्त एकदाच रुग्णालयात भेट देवून चौकशी केली. आणखी किमान पाचवेळा रावेरला जावे लागणार आहे. स्वतंत्ररित्या चौकशी व रेकॉर्ड तपासावे लागणार असून त्यासाठी कालावधी लागेल, असे समितीतील डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, चौकशी समिती नुसता फार्स असल्याचीही टीका होऊ लागली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव