मंगरूळ शिवारात गोगलगायींची धाड
By Admin | Updated: October 6, 2015 00:25 IST2015-10-06T00:25:24+5:302015-10-06T00:25:24+5:30
के:हाळे : रब्बी लागवडीपूर्वीच हंगामाला ग्रहण, दिवसागणिक संख्या लागली वाढू

मंगरूळ शिवारात गोगलगायींची धाड
रमेश पाटील ल्ल के:हाळे रावेर तालुक्यातील मंगरूळ व जुनोनेसह के:हाळे परिसरात गोगलगायींनी अक्षरश: हैदोस घातला असल्यामुळे शेतक:यांना पुढील रब्बी हंगामाबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. यामुळे हंगामापूर्वीच ग्रहण लागल्याचे चित्र असून लागवड थांबविली गेली आहे. जीवशास्त्रीय भाषेत गोगलगाय हा प्राणी अत्यंत शांत व गरीब असली तरी शेतक:यांसाठी मात्र मोठा धोकादायक ठरत आहे. यावर्षी खरीप हंगामातील केळीला सपाटून मार बसला असला तरी रब्बीमधील हंगामात सरासरी गाठण्याच्या तयारीत मन बनविलेला शेतकरी या प्रकारामुळे पुन्हा खचला आहे. मृग केळीचा हंगाम संपल्यानंतर केळीच्या जुनारी बागा साफसफाई करून रब्बीतील आंतरपीक घेण्यासाठी सज्ज करून ठेवल्या आहेत. तर काही तयार केल्या जात आहे. या जुनारींच्या बागांमध्ये कापणी झालेल्या खोडांच्या बुंध्याखाली अथवा कुजलेल्या खोडाखाली हजारोंच्या संख्येत गोगलगायी लपून बसलेल्या आढळत आहे. त्या दिवसभर थंड जागा तथा कुजलेले खोड टाकलेल्या ढिगाखाली तसेच उभ्या असलेल्या खोडांवर चढून आश्रय घेतात. संध्याकाळी व रात्री सर्वत्र शेतांमध्ये विखुरतात व अन्न म्हणून शेतातील पेरणी केलेले नवीन उगवलेले नरम कोंब कुरतळून फस्त करतात. यामुळे शेतकरीवर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. ज्या शेतांमध्ये लागवड नसेल अशा ठिकाणी केळीचे नरम फुटवेसुद्धा फस्त केले जात आहेत. एकेका बुंध्याखाली असलेली संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे यावर नियंत्रण कसे व कधी मिळेल यामुळे शेतकरी सापडेल तो मार्ग स्वीकारत आहे. मात्र यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे अशक्य झाले आहे. जर हीच स्थिती पंधरवडय़ापेक्षा जास्त राहिली तर रब्बी हंगामाच्या लागवडीची वेळसुद्धा निघून जाईल. या भीतीमुळे परिसरातील शेतकरीवर्गाची त्रेधातिरपीट होत आहे. लाखोंच्या घरात असलेली गोगलगायींची संख्या कशी नियंत्रणात येईल, हा प्रश्न जटिल बनला आहे. यापूर्वी कधी अशा प्रकारचा अनुभव परिसरातील शेतक:यांना आला नसल्यामुळे याबाबत अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. स्नेल किलचा तुटवडा दरम्यान, यापूर्वी काही शेतक:यांनी तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी या औषधांचा तपास केला असता आढळले नाही. यामुळे चिंता अधिक वाढली आहे.