शनिवारच्या बाजारातून २५ विक्रेत्यांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:15 IST2021-02-14T04:15:39+5:302021-02-14T04:15:39+5:30

मनपा अतिक्रमण विभागाने शनिवारी फुले मार्केट, चौबे मार्केट, सुभाष चौक या भागात आठ पासूनच कारवाई मोहिम राबविली. ...

Goods of 25 vendors seized from Saturday market | शनिवारच्या बाजारातून २५ विक्रेत्यांचा माल जप्त

शनिवारच्या बाजारातून २५ विक्रेत्यांचा माल जप्त

मनपा अतिक्रमण विभागाने शनिवारी फुले मार्केट, चौबे मार्केट, सुभाष चौक या भागात आठ पासूनच कारवाई मोहिम राबविली. सुरूवातीला या विक्रेत्यांना दुकाने न मांडण्याची सांगण्यात आले. मात्र, तरीदेखील या विक्रेत्यांनी वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या ठिकाणी दुकाने थाटल्यामुळे मनपा अतिक्रमण विभागाने या सर्व विक्रेत्यांचेसाहित्य जप्त केले. तसेच जुन्या बस स्थानक परिसरातीलही अनेक व्यावसायिकांचे सामान जप्त केले. दिवसभरात एकूण २५ विक्रेत्यांचा माल जप्त केल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

नेहरू चौकात आजपासून कारवाई

दर रविवारी नेहरू चौकापासून ते थेट टॉवर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर विविध प्रकाराचे व्यावसायिक दुकाने थाटत असतात. यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो. या विक्रेत्यांना कुठलीही परवानगी नसल्यामुळे, या विक्रेत्यांवर रविवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सकाळपासून अतिक्रमण विभागाचे वाहन नेहरू चौकात तैनात राहणार असल्याचेही संतोष वाहुळे यांनी सांगितले.

Web Title: Goods of 25 vendors seized from Saturday market