शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

गुडबाय २०१९ : विधानसभा निवडणुकीत भाजप का राहिले ‘मायनस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:21 IST

सहा जागांवरुन चारवर

सहा जागांवरुन चारवरयंदाची विधानसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या बंडखोरीमुळे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती नसताना भाजपने जिल्ह्यातील ११ पैकी सहा जागा मिळविल्या होत्या. २०१९मध्ये युती झाली मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या चार ठिकाणी बंडखोरी केली. यात शिवसेनेला मात देण्याचा एकप्रकारे प्रयत्न झाला. मात्र याचा फटका उलट भाजपलाच बसून त्यांच्या जागा सहावरून चारवर आल्या. विशेष म्हणजे एकही बंडखोर निवडून आला नाही.शिवसेना जिल्हा प्रमुखांचीही बंडखोरीभाजपकडून बंडखोरी होत असताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे स्वत: मुक्ताईनगर या भाजपचा उमेदवार असलेल्या मतदार संघातून अपक्ष म्हणून उभे राहिले व निवडूनही आले.पंतप्रधानांच्या सभेतच वादविधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीवरून जिल्ह्यात शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच खटके उडत राहिले. जळगाव ग्रामीण मतदार संघातील सेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरीवरून जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यानच गिरीश महाजन यांना जाब विचारला व दोघांमध्ये चांगलाच वाद झाला.खडसेंना उमेदवारी नाकारलीभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना २०१९च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे रास्ता रोके, जाळपोळ असे मोठे पडसाद जिल्ह्यात त्या वेळी उमटले. अखेर खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली.‘लोकसभे’त बरोबरीलोकसभा निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील दोन जागा कायम राखण्यात यश मिळविले. यात रावेर मतदार संघातून रक्षा खडसे या विजयी झाल्या तर जळगावातून उन्मेष पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.उमेदवारी बदलावरून वादंगलोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन खासदार ए.टी. पाटील यांची उमेदवारी नाकारुन विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना भाजपने जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र नंतर त्यांचीही उमेदवारी बदलली. त्याचे पडसाद अमळनेरात उमटले व माजी आमदार बी.एस. पाटील यांना मारहाण करण्यात आली.काँग्रेसने खाते उघडले२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ११ पैकी एकही जागा मिळवू न शकलेल्या काँग्रेसने या वेळी यावल मतदारसंघात विजय मिळवित आपले खाते उघडले.विजयाचे एकमेकांना आव्हानविधानसभा निलडणुकीपूर्वीच तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी एकमेकांना विजयी होऊन दाखविण्याचे आव्हान चर्चेचा विषय ठरला.एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चाअगोदर मंत्रीमंडळातून बाहेर काढणे, विधानसभेची उमेदवारी नाकारणे, नंतर निवडणुकीत कन्येचा झालेला पराभव यामुळे पक्षातील मंडळींवर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले. आपल्या मुलीच्या पराभवास पक्षातील काही मंडळी कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.संकलन- विजयकुमार सैतवाल

टॅग्स :Jalgaonजळगाव