आवाहनाला चांगला प्रतिसाद, जामनेरचे रस्ते निमर्नुुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 16:01 IST2020-04-03T15:57:06+5:302020-04-03T16:01:35+5:30

लॉकडाऊन काळातही रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी होत नसल्याने नागरिकांना केलेल्या तीन दिवसीय ‘बंद’ला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.

Good response to appeals, Jamner's roads should be laid | आवाहनाला चांगला प्रतिसाद, जामनेरचे रस्ते निमर्नुुष्य

आवाहनाला चांगला प्रतिसाद, जामनेरचे रस्ते निमर्नुुष्य

ठळक मुद्देभाजी विक्रेते एकाच ठिकाणी न थांबता, फिरून करताहेत विक्रीप्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

जामनेर, जि.जळगाव : लॉकडाऊन काळातही रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी होत नसल्याने नागरिकांना केलेल्या तीन दिवसीय ‘बंद’ला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. रस्ते निमर्नुष्य दिसत होते.
रस्त्यावरील गर्दीही भाजी खरेदीसाठीच होत असल्याने भाजी विक्रेत्यांनी एकाच ठिकाणी न थांबता वेगवेगळ्या भागात फिरून विक्री करावी या आवाहनाला त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
औषधी व किराणा दुकाने उघडी असल्याने सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळत नागरिकांनी सहकार्य केले. येत्या रविवारपर्यंत १०० टक्के बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Good response to appeals, Jamner's roads should be laid