आंबे उत्पादकांना यंदा ‘अच्छे दिन’

By Admin | Updated: January 19, 2017 00:14 IST2017-01-19T00:14:03+5:302017-01-19T00:14:03+5:30

आम्रमोहोर बहरला : थंडीमुळे पोषक वातावरण, सुगीचाही बहर, शेतकºयांच्या आशा पल्लवित

'Good day' for mango growers | आंबे उत्पादकांना यंदा ‘अच्छे दिन’

आंबे उत्पादकांना यंदा ‘अच्छे दिन’

भडगाव : तालुक्यात  सध्या   रब्बी पिकांच्या हिरवळीने शेतशिवार नटला आहे.  त्यात आंब्यांना पिवळे-केशरी सोन्याच्या अलंकाराप्रमाणे आम्रमोहोर बहरल्याने शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची आशा बळावली आहे.
तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. इतर पिकासोबतच आजोबा-पणजोबांनी शेताच्या बांध कोºयावर, जामदा उजवा-डावा कालव्यावर विविध आंब्याची रोपे लावली असून ती आज डेरेदार वृक्ष झाली आहेत.  या आंबे फळबहार खरेदी विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयाची आर्थिक उलाढाल केली जाते. आंबे हंगामातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळून उत्पन्नासाठी आधार बनले आहे.
तालुक्यात गावरान जातीची आंब्याची झाडे  मोठ्या प्रमाणावर आहेत. यात सोप्या, दोडी, गोट्या,  सेंद्र्या, काळ्या, बाजºया, लंगड्या, ढवळ्या अशी आंब्याची नावे आहेत. थंडीमुळे आंब्यांने मोठ्या प्रमाणावर आम्रमोहोर बहरल्याचे दिसत आहे.  यंदा जमिनीत जलपातळी चांगली असल्याने आम्रमोहोर बहरत असल्याचे शेतकरी बोलत आहेत.
 या झाडांचा सौदा केला जातो. आंबे खरेदी-विक्रीतून दरवर्षी हजारो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. जामदा उजवा-डावा कालव्यावरील आंब्याच्या झाडांचाही व्यापाºयांना लिलाव दिला जातो.  शेतकºयांना आंबे उत्पन्नातून संसाराचा गाडा चालविण्यास मोठा आधखार मिळत आहे.  शेतकरी तुरळकच आंबे लागवड करतात. शासन तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंब, चिंच, सिसम लागवड करते. तालुक्यात आंबे लागवडीचे प्रमाण अधिक वाढवावे. कारण यामुळे शेतकºयांना उत्पन्न वाढीसाठी लाभ होऊ शकतो.
तालुक्यातील बात्सर येथे गावकºयांनी हजारो आंब्याची झाडे लावून ती जतन ेकेली आहेत. त्यामुळे गावाला हे उत्पन्नाचे साधन बनणार आहे. बात्सर गावाचा आदर्श घेऊन शासनाने गावोगावी आंब्याची रोपे अधिक प्रमाणात लावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पाटबंधारे विभागानेही जामदा उजवा-डाव्या कालव्यालगत आंबे लागवडीचे नियोजन करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
पूर्वी लावलेली डेरेदार आंब्याची झाडे, आमराया  नजरेस पडत आहेत. मात्र  शेतकरीच  हिरव्या डेरेदार वृक्षांवर घाव घालून या झाडांची कत्तल करीत आहे. अवैधरीत्या या झाडांची तोड केली जात असतानाचे दृष्य नजरेला पडत आहे. या आंब्याच्या झाडांची कत्तल थांबवणे गरजेचे आहे तर आमराया लवकरच नष्ट होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.  वादळवाºयानेही आंब्याची झाडे, फांद्या तुटून मोठे नुकसान होते. हे नुकसान रोखणे आवश्यक आहे.
 

Web Title: 'Good day' for mango growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.