तलवार घेवून फिरणा:यास पाठलाग करुन पकडले
By Admin | Updated: October 11, 2015 01:16 IST2015-10-11T01:16:23+5:302015-10-11T01:16:23+5:30
जळगाव : हातात तलवार घेवून दहशत माजविणा:या पूनम ढंढोरे याला शनिवारी सकाळी अकरा वाजता शनी पेठ पोलिसांनी पाठलाग करुन पकडले.

तलवार घेवून फिरणा:यास पाठलाग करुन पकडले
जळगाव : हातात तलवार घेवून दहशत माजविणा:या पूनम कांतीलाल ढंढोरे (वय 40, रा.गुरुनानक नगर) याला शनिवारी सकाळी अकरा वाजता शनी पेठ पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनी पेठ पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक संदीप पाटील, नरेंद्र ठाकरे, अनिल धांडे, बैसाणे आदी पेट्रोलिंग करीत असताना पूनम हा तलवार घेवून फिरत असल्याचे या पथकाला समजले. गुरुनानक नगरात पोलीस आल्याचे पाहून त्याने तेथून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो त्याच्या घरात घुसून लपून बसला होता. घराच्या झडती घेतली असता तलवारीबाबत तो टाळाटाळ करीत होता. खाकीचा हिसका दाखविल्यानंतर तलवार काढून दिली.