गोंडगाव जि. प. शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ललितकुमार मांडोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:44+5:302021-07-24T04:11:44+5:30
या सभेत व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली. यामध्ये ललित कुमार बापूराव मांडोळे यांची अध्यक्ष म्हणून, तर उपाध्यक्ष ...

गोंडगाव जि. प. शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ललितकुमार मांडोळे
या सभेत व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली. यामध्ये ललित कुमार बापूराव मांडोळे यांची अध्यक्ष म्हणून, तर उपाध्यक्ष म्हणून गजानन सीताराम पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिक्षणप्रेमी म्हणून आनंदा निंबाजी सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्ञानेश्वर युवराज पाटील यांची निवड करण्यात आली. पालक सदस्यांमध्ये शेख नसरुद्दीन शेख अजमुद्दीन, किशोर एकनाथ ठाकूर, सर्जेराव संतोष पाटील, जितेंद्र शालिग्राम पाटील यांची निवड झाली. पालक महिला सदस्यांमध्ये वनिता शरद थोरात,
कल्पना समाधान मोरे, जयश्री प्रशांत गुरव, उज्ज्वला रोहिदास सोनवणे यांची निवड करण्यात आली. शिक्षक सदस्य म्हणून पूनम साहेबराव पवार, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्तिक कैलास कोळी, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून आर्शिया फारुक मन्यार आणि समितीच्या सचिव शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा आत्माराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
अशा पद्धतीने ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पालक वर्ग, गोंडगाव शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत माजी शालेय व्यवस्थापन समितीला केंद्राचे केंद्रप्रमुख नंदकिशोर बैरागी यांच्या हस्ते निरोप देऊन नवीन शालेय व्यवस्थापन समितीचा सत्कार अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शाळेच्या उपशिक्षिका संगीता शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले व सरला देसाई यांनी आभार मानले.
फोटो.
ललितकुमार मांडोळे. २४/१