गोंडगाव येथे ३३२ जणांनी घेतले लसीचे डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:09+5:302021-09-09T04:22:09+5:30
पावसाची ‘ब्रेक के बाद’ बॅटिंग सुरू होती. मात्र, सकाळपासून नागरिक, महिलांसह वृद्ध मंडळींच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. कोविड सिल्कचा ...

गोंडगाव येथे ३३२ जणांनी घेतले लसीचे डोस
पावसाची ‘ब्रेक के बाद’ बॅटिंग सुरू होती. मात्र, सकाळपासून नागरिक, महिलांसह वृद्ध मंडळींच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. कोविड सिल्कचा नागरिक व महिलांना पहिला व दुसरा लसीचा असे एकूण ३३२ डोस आरोग्य विभागामार्फत देण्यात आले.
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गोंडगाव येथे उपप्राथमिक आरोग्य केंद्र येते. कजगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ.प्रशांत पाटील यांचे नियोजनानुसार ३३२ लसीचे डोस नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. सकाळपासून नागरिक व महिला रांगेत नंबर लावून थांबलेले दिसून आले.
या कामी डाॅ.पूनम सांगवीकर, आरोग्यसेवक सुरेश वानखेडे, विजय दाभाडे, एस.एम. गढरी, योगिता गढरी, तसेच शिवाजी पाटील, कर्मचारी स्वप्निल सोनवणे, प्रदीप पाटील, कैलास पाटील, विवेक पाटील, मोहन पाटील, भिका पाटील आदी कर्मचाऱ्यांनीही विशेष परिश्रम घेतले.