शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णनगरी जळगावात सुवर्ण सांधेरोपण, शस्त्रक्रियेनंतर तत्काळ चालू लागले रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 09:56 IST

गुडघ्याची झिज झाल्यानंतर रुग्णास पुन्हा पहिल्यासारखे चालता-फिरता यावे यासाठी कोणतीही अ‍ॅलर्जी नसलेले सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याचे संशोधन पुढे आले असून हे सुवर्ण मुलामा असलेले सांधे सुवर्णनगरी जळगावात यशस्वीरित्या बसविण्यात आले आहे.

विजयकुमार सैतवालजळगाव : गुडघ्याची झिज झाल्यानंतर रुग्णास पुन्हा पहिल्यासारखे चालता-फिरता यावे यासाठी कोणतीही अ‍ॅलर्जी नसलेले सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याचे संशोधन पुढे आले असून हे सुवर्ण मुलामा असलेले सांधे सुवर्णनगरी जळगावात यशस्वीरित्या बसविण्यात आले आहे.वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अनेकांना गुडघ्याचा त्रास उद्भवणे बऱ्याच प्रमाणात वाढले असून त्यामुळे अनेक जण त्रस्त असतात. इतकेच नव्हे यामुळे अनेकांचे चालणे-फिरणेही बंद होऊन जाते. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम सांधेरोपण पर्याय असून गेल्या अनेक वर्षांपासून सांधेरोपण केले जात आहे.

आता यामध्ये नवीन संशोधन पुढे आले असून नेहमी वापरात येणाºया कोबाल्ट क्रोम धातूच्या कृत्रिम सांध्याऐवजी सुवर्ण मुलामा असलेला सांधा वैद्यकीय क्षेत्रात वरदान ठरत आहे. कृत्रिम सांध्याच्या शस्त्रक्रियेनंतर दोन टक्के रुग्णांना अ‍ॅलर्जी होते. ही अ‍ॅलर्जी टाळून रुग्णास कोणताही त्रास होऊ नये म्हणून सुवर्ण मुलामा असलेला सांधा बसविला जात आहे. या सांध्यामुळे कोणतीही अ‍ॅलर्जी न होता रुग्ण शस्त्रक्रियेनंतर लगेच चालू-फिरू शकत आहे. इतकेच नव्हे नंतर या सांध्यामुळे कोणतीही बाधा न होता आयुष्यभर रुग्ण व्यवस्थित चालू-फिरू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.सुवर्णनगरीला मानजळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असल्याने जळगावात सुवर्ण खरेदीसाठी देशभरातील ग्राहक येत असतात. त्यामुळे जळगावला सुवर्णनगरी म्हणून संबोधले जाते. योगायोगाने या सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याची पहिली शस्त्रक्रिया सुवर्णनगरी जळगावातच झाली.पुणे येथील एका ६५ वर्षीय वृद्धाला जळगावात पहिला सुवर्ण मुलाम्याचा सांधा बसविण्यात आला. वॉकरच्या सहाय्याने आलेला हा ६५ वर्षीय रुग्ण हा सांधा बसविल्यानंतर येथून चालत गेला. त्यानंतर आतापर्यंत एकूण १० जणांना या सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याचे रोपण करण्यात आले असून कोणालाही अ‍ॅलर्जी झाली नसल्याची माहिती डॉ. मनीष चौधरी यांनी दिली. धकाधकीचे जीवन व इतर कारणांमुळे गुडघ्याचा त्रास वाढत असताना कृत्रिम सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियांमध्येही वाढ होत आहे. यात अधिकाधिक प्राधान्य सुवर्ण मुलाम्याच्या सांध्याला दिले जात असल्याचेही डॉ. मनीष चौधरी यांनी सांगितले.केवळ सुवर्ण मुलामाहा सांधा सोन्याचा असल्यासारखा दिसत असला तरी तो सोन्याचा नसून त्यावर केवळ मुलामा आहे. या मुलाम्यामुळेच शरीराला कोणतीही बाधा होत नाही, असे सांगण्यात आले.सुवर्ण मुलाम्याच्या सांध्यामुळे अ‍ॅलर्जी होत नाही. या कृत्रिम गुडघ्यास पसंती दिली जात आहे. - डॉ. मनीषचौधरी.

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव