जळगाव - सोने-चांदीच्या भावातील चढता आलेख कायम असून, सोमवारी (३१ मार्च) सोन्याच्या भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ९० हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. सोन्याच्या भावातील हा पुन्हा नवीन उच्चांक असून, सव्वादोन महिन्यांतच सोन्याने ८० ते ९० हजारांचा पल्ला पार केला.
चांदीच्याही भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख एक हजार ५०० रुपये प्रतिकिलो झाली. दिवाळीपासून सोने-चांदीच्या भावात झपाट्याने वाढ होत असून, ते नवनवीन उच्चांक गाठत आहेत.
कॅरेटनुसार सोने भावकॅरेट भाव२४ कॅरेट ९०,७००२२ कॅरेट ८३,०८०१८ कॅरेट ६८,०३०
६० ते ९० हजारांचा असा पार केला टप्पा दिनांक भाव ४ एप्रिल २०२३ ६०,१५० ४ एप्रिल २०२४ ७०,००० २२ जानेवारी २०२५ ८०,६०० ३१ मार्च २०२५ ९०,७००
असे आहेत भावधातू मूळ भाव जीएसटीसहसोने ९०,७०० ९३,४२१चांदी १,०१,५०० १,०४,५४५
सोने भाववाढीचा वेग६० ते ७० हजार एक वर्ष७० ते ८० हजार ९ महिने १८ दिवस८० ते ९० हजार दोन महिने ९ दिवस