शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘अक्षय्य’ मुहूर्तावर सोने ९०० रुपयांनी वाढले, ३० ते ३५ कोटींची उलाढाल; चांदी दीड हजाराने वधारली

By विजय.सैतवाल | Updated: May 10, 2024 16:26 IST

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी होऊन त्यात किरकोळ चढ-उतार सुरू होता; मात्र ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ झाली.

जळगाव : साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्णनगरी जळगावात सोन्याला दुपटीपेक्षा अधिक मागणी राहून या मुहूर्तावर ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शुक्रवारी, १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. तसेच चांदीच्याही भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. ऐन मुहूर्तावर भाव वाढले तरी ग्राहकांनीही खरेदीचा ‘अक्षय्य’ आनंद घेतल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी होऊन त्यात किरकोळ चढ-उतार सुरू होता; मात्र ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात ९०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे २२ एप्रिलनंतर सोन्याचे भाव पुन्हा एकदा ७३ हजारांच्या पुढे जात ते ७३ हजार १०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले; तसेच चांदीच्याही भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती २१ एप्रिलनंतर पुन्हा ८४ हजार रुपयांच्या पुढे गेली व ती ८४ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.एकीकडे भाव वाढले असले तरी अक्षय मुहूर्तामुळे सोने-चांदीच्या विक्रीत वाढ झाल्याचे शहरातील प्रमुख ज्वेलर्सच्या वतीने सांगण्यात आले. या प्रमुख सराफा दुकानांसह एकूण १७५ फर्ममध्ये एकूण किती उलाढाल झाली याचा नेमका आकडा सांगणे कठीण असले तरी ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दुपारी वाढली गर्दी

सोने खरेदीसाठी दुपारी १२ नंतर गर्दी वाढत गेली. मुहूर्तावर नवीन दागिने खरेदी तर झालीच सोबतच या मुहूर्तावर खरेदी केलेले सोने अक्षय राहते, अशी श्रद्धा असल्याने दागिने घ्यायचे नसले तरी किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी केले पाहिजे, याकडेही मोठा कल होता. त्यामुळे सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल दिसून आली.

ग्राहकांचा खरेदीसाठी उत्साह

दररोजपेक्षा आज सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व असल्याने ग्राहकांनी थोडे तरी सोने खरेदी केले. - आकाश भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.

टॅग्स :JalgaonजळगावGoldसोनंAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीया