शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचे दर घसरले; खरेदीची संधी वाढली, पितृ पंधरवाड्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 09:08 IST

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली होती. किरकोळ चढ-उतार वगळता ते सातत्याने ५१ ते ५२ हजारांवर राहिले.

जळगाव/नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून ५१ ते ५२ हजार रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात पितृ पक्ष सुरू झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. सोमवारी ते ५० हजार ४५० रुपये प्रति तोळ्यावर आले. यापूर्वी २१ जुलै रोजी सोन्याचे भाव ५० हजार ७०० रुपयांवर होते. दुसरीकडे गेल्या आठवड्याच्या तुलनेत चांदीच्या भावात वाढ झाली आहे. 

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली होती. किरकोळ चढ-उतार वगळता ते सातत्याने ५१ ते ५२ हजारांवर राहिले. मात्र, गेल्या आठवड्यापासून त्यात घसरण सुरू झाली. तसेच पितृ पक्षात अनेकजण खरेदी टाळत असतात. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मागणी कमी असल्याने सोन्याचे भाव कमी होत आहेत. १३ सप्टेंबर रोजी ५१ हजार २०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १४ रोजी ४०० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. सोमवारी त्यात १५० रुपयांची घसरण होऊन ते ५० हजार ४५० रुपयांवर आले. 

चांदीच्या दरात प्रचंड अस्थिरतादुसरीकडे चांदीचे भाव वाढत आहे. १२ सप्टेंबर रोजी ५६ हजार ८०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १३ रोजी एकाच दिवसात एक हजार रुपयांची वाढ झाली व ती ५७ हजार ८०० रुपयांवर पोहोचली. सोमवारी ती ५७ हजार ५०० रुपयांवर आली.दिल्लीत सोने ५० हजारांखालीदिल्लीत सोमवारी सोन्याच्या दरात ३०३ रुपयांची घसरण झाल्यामुळे ते प्रति १० ग्रॅम ४९,५७१ रुपयांवर आले आहे. मागणी कमी आणि रुपयातील घसरणीमुळे दर उतरले, असे तज्ज्ञांनी सांगितले. चांदीच्या दरातही १९७ रुपयांनी घसरण होत ती ५७,२८७ रुपये प्रति किलोवर आली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावGoldसोनं