सोन्याची सापडलेली अंगठी प्रामाणिकपणे केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:52 IST2019-06-18T18:52:05+5:302019-06-18T18:52:09+5:30
दुध डेअरी चालकाचे होतेय कौैतुक

सोन्याची सापडलेली अंगठी प्रामाणिकपणे केली परत
वरखेडी, ता.पाचोरा : येथील डेअरीचालकाने सापडलेली सोन्याची अंगठी संबंधितास प्रामाणिकपणे परत केली. या प्रामाणिकपणाचे गावात कौतुक केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, वरखेडी येथील कौतिक सुक्राम भोई यांची सहा ग्रॅम सोन्याची अंगठी बाजारपेठेतील येथील राजू गणपत पाटील यांच्या दूध डेअरीवर नकळत पडली. दुकान बंद करत असताना सदरची अंगठी दूध डेअरी संचालक राजू पाटील यांना आढळून आली. त्यांनी ती अंगठी पितळाची किंवा बेन्टेक्सची असेल असे समजून सहज सांभाळून ठेवली. इकडे कौतिक भोई यांनी अंगठी सर्वदूर शोधाशोध केली मात्र ती सापडली नाही. या अंगठीची किंमत १७००० हजार रुपये होती. दोन -तीन दिवसानंतर कौतिक भोई हे याच दूध डेअरीवर कामानिमित्त गेले. त्यावेळी त्यांनी हरवलेल्या अंगठी बाबत सांगितले तेव्हा राजू पाटील यांनी ड्रॉवरमधून ही अंगठी काढून दिली. याबद्दल भोई यांनी राजू पाटील यांचे मनापासून आभार मानले.