स्वाती देव सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:12 IST2021-07-05T04:12:04+5:302021-07-05T04:12:04+5:30

भुसावळ : इनरव्हीलच्या प्रेसिडेंट स्वाती देव यांना प्लॅस्टिक निर्मूलन ग्रीन पर्यावरण यासाठी द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ...

Goddess Swati honored | स्वाती देव सन्मानित

स्वाती देव सन्मानित

भुसावळ : इनरव्हीलच्या प्रेसिडेंट स्वाती देव यांना प्लॅस्टिक निर्मूलन ग्रीन पर्यावरण यासाठी द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय इनरव्हील जगातील सर्वात मोठी महिला संघटना असून, इनरव्हील जिल्हा ३०३ द्वारा एन्कोमॅस्टिक पुरस्कार २०१९-२० या वर्षाचे पुरस्कार देण्यात आले. त्यात स्वाती देव यांना द्वितीय पुरस्कार मिळाला.

जिल्हाध्यक्ष वैजयंती पाठक, जिल्हा सचिव अश्विनी गुजराती यांनी स्वाती देव यांना सन्मानित केले. तसेच उत्तम सचिव म्हणून वंदिता पारे यांना सन्मानपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. रॉकिंग आयएसओ द्वितीय बक्षीस रुचिका शर्मा यांना मिळाले. शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केले.

असोसिएशन सीसीसीसी रश्मी शर्मा, रत्नकांता अग्रवाल, कमल सचदेव, शीतल भराडिया, रजनी सावकारे यांचे मार्गदर्शन लाभले. सेक्रेटरी वंदिता पारे, रुचिका शर्मा, अलका भटकर यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Goddess Swati honored