शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

खोपडीचे देव उठले आता बळीराज्याची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 19:55 IST

गुरुवारी कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे खोपडी पूजनाने देव उठवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

संजय हिरे खेडगाव, ता.भडगाव :  गुरुवारी कार्तिकी एकादशीला परंपरेप्रमाणे खोपडी पूजनाने देव उठवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक उत्कंठा संपली. येथून  पुढे शेतकरी रब्बीच्या पेरणीबरोबरच घरातील उपवर मुलामुलीच्या वधु-वर संशोधनासाठी  एकच लगीनघाई सुरू होईल.हंगाम व धार्मिक पंरपंरेची सांगडआषाढी एकादशीला खरिपातील पेरण्या झालेल्या असतात, तर कार्तिकी एकादशीला खरिप हंगाम हाती आलेला असतो. नवीन धान्याच्या राशी, कापसाच्या रुपात घरात आलेले पांढरे सोने आदी शेतक-यांसाठी लक्ष्मी व एकूणच वैभव असते. नवीन अन्नधान्य, शेतात पिकलेला भाजीपाला, बोर, ऊस याचे सेवन आजच्या एकादशीला पूजा-अर्चा करुन मगच करण्याचा विधी आजही जोपासला जातो. ऊस किंवा ज्वारीच्या ताठ्याची झोपडीवजा खोपडी करुन तिला नवीन वस्र अलंकार घालत यात हे शेतातील वैभव ठेवून पूजा होते. मगच नवीन हंगामात निघालेल्या अन्नधान्याचे ग्रहण केले जाते.   खोपडीचे देव उठलेकार्तिकी एकादशीनिमित्ताने गुरुवारी सकाळी खेडोपाडी घराघरांचे उंबरठे, अंगण दिव्यांनी उजळून  निघाले. संध्याकाळी गल्लोगल्ली, चौक, समाज, भाऊबंदकी मिळून  खोपडीतले देव उठवण्यात आले. श्रावण ते कार्तिक असे चातुर्मासातील चार महिने देव निद्रा घेतात, ही धार्मिक भावना आहे. या योगे खोपडीत सर्व देवादिकांना बसवत पूजाअर्चा असा विधी व खंडेरायाची तळी भरुन, पूजेसाठी आणलेला ताट, तांब्या हाती घेत ते टाळ वाजावेत तसे वाजवत, श्रीकृष्ण सावळा..! बोर, भाजी, आवळा असे म्हणत पाच प्रदक्षिणा घालून देवांना उठविण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर लहान मुलाला खोपडीत बसवून शेतमालाचे भाव कसे राहतील? याची विचारणा झाली. ऊस, बोरे, गुळ, खोबरे आदी प्रसाद वाटण्यात आला. एकच लगीनघाई  खरीप हंगामातील कपाशी आदी शेतं खाली झाली आहेत. खोपडी एकादशीला रब्बी गहू, हरभरा पेरण्याचा मुहुर्त साधला जातो. यावर्षी एकाच वेळी सर्व शिवार खाली होत असल्याने मशागतीसाठी, ट्रॅक्टरला वेंटीग लिस्ट आहे. अशात घरातील उपवर मुलीमुलांसाठी स्थळ शोधमोहीम, विवाह जुळवणे आदी एकच धावपळ शेतक-यांची होणार आहे. आमुच्या अंगणी तुळस, देव झालेत जावईपंरपंरेनुसार आज काही समाज व चौकातील खोपडी पूजेनंतर तुळशी विवाहांना आरंभ होईल. पुराणानुसार वृंदा अर्थात तुळशीचा विवाह  श्रीकृष्णाशी लावून दिला जातो व मगच घरातील विवाहयोग्य मुलगा, मुलगी यांच्यासाठी स्थळ शोध मोहीम सुरू होते. अंगणातील तुळशीला कन्या समजले जाते  ज्याले नाही लेक त्येनी तुळस लावावी आपुल्या अंगणात  देव करावे जावई...यानुसारच तुळशीचा विवाह होतो. काही गावातून खोपडी पूजनानंतर लगेच तुळशी विवाह लावला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमेपर्यत तुळशीविवाह   चालतात. तुळशीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळेच व्रत करू एकादशी, दारी लावली तुळशी ही भावना या गीतातून व्यक्त होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhadgaon भडगाव