चेहरा हरवून जन्माला आले बोकड...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:35+5:302021-08-21T04:20:35+5:30
प्रथमदर्शनी त्याला पाहताच भीती वाटते. त्याचे सर्व अवयव सर्वसामान्य बोकडासारखी आहेत. हनवटी, तोंडच दिसून येत नाही. त्याचे दोन्हीही डोळे ...

चेहरा हरवून जन्माला आले बोकड...
प्रथमदर्शनी त्याला पाहताच भीती वाटते. त्याचे सर्व अवयव सर्वसामान्य बोकडासारखी आहेत. हनवटी, तोंडच दिसून येत नाही. त्याचे दोन्हीही डोळे एकाच ठिकाणी आहेत. त्याचा चेहरा पाहताक्षणी माणसासारखा नजरेस पडतो. अशा विचित्र बोकडास पाहण्यासाठी कुतूहलापोटी गर्दी होत आहे. बोकडाचा चेहरा काही प्रमाणात माणसासारखा दिसत आहे. त्याचे तोंड अर्धेच उघडत असल्यामुळे त्याला दूध पिता येत नाही. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी ताईबाई यांनी त्याला बाटलीने दूध पाजायला सुरुवात केली आहे. बोकड मात्र सुदृढ आहे. याला बघ्यांनी मात्र दैवी चमत्कार असल्याचे सांगितले. तो दैवी चमत्कार असो की त्याच्या शरीराची अपूर्ण झालेली वाढ या विचित्र प्राण्याला बघण्यासाठी परिसरातून मात्र मोठी गर्दी होत आहे.
फोटो कॅप्शन. पळासखेडे येथील ताईबाई सोनवणे यांच्या बकरीने जन्मास घातलेला विचित्र बोकड. २१/२