जीएमसी आजपासून नॉनकोविड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:47+5:302021-07-22T04:12:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुरुवारपासून नॉनकोविड उपचारांना सुरुवात होणार आहे. त्याचे नियोजनपूर्ण झाले ...

जीएमसी आजपासून नॉनकोविड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गुरुवारपासून नॉनकोविड उपचारांना सुरुवात होणार आहे. त्याचे नियोजनपूर्ण झाले आहे. सध्या रुग्णालयातील आयसीयूमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण आहेत, तर एका रुग्णाला मोहाडी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
जीएमसीतील नॉनकोविड यंत्रणेची माहिती देताना डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, ‘सध्या रुग्णालयात पाच रुग्ण आयसीयूमध्ये आहेत, तर एकाला हलविण्यात आले आहे. तीन जणांना बुधवारी कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. त्याशिवाय म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण आयसीयूत आहे, तर सहा जण पोस्ट कोविड म्युकरमायकोसिसचे आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयातच उपचार केले जाणार आहेत.’
जीएमसीत सध्या कोविडसाठी आयसीयू सुरू राहणार आहे.
मोहाडी रुग्णालयात एकच रुग्ण
मोहाडी येथील महिला रुग्णालयात एकच रुग्ण दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता. आता हा एकच रुग्ण येथे दाखल आहे.