पंढरीची सायकलवारी करणाऱ्या चाळीसगावकर वारकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:52+5:302021-07-27T04:17:52+5:30

सोमवारी त्यांच्या हस्ते शिवनेरी या त्यांच्या निवासस्थानी चाळीसगाव ते पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर या तीर्थस्थळांची १ हजार २० किमी परतीच्या प्रवासासह सायकलवारी ...

Glory to Chalisgaonkar Warkaris who cycle Pandhari | पंढरीची सायकलवारी करणाऱ्या चाळीसगावकर वारकऱ्यांचा गौरव

पंढरीची सायकलवारी करणाऱ्या चाळीसगावकर वारकऱ्यांचा गौरव

सोमवारी त्यांच्या हस्ते शिवनेरी या त्यांच्या निवासस्थानी चाळीसगाव ते पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर या तीर्थस्थळांची १ हजार २० किमी परतीच्या प्रवासासह सायकलवारी करणाऱ्या हौशी सायकलवीरांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी सायकलवीरांचे औक्षण केले. विठुराया व रुक्मिणी मातेची मूर्ती भेट देऊन सायकल वारकऱ्यांचा सन्मान केला गेला.

यावेळी भास्कर पाटील, योगेश खंडेलवाल, जगदीश चव्हाण, मनोज गोसावी आदी उपस्थित होते.

यांचा झाला गौरव

चाळीसगाव ते पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर ही एक हजार २० किमीची सायकलवारी करणारे टोनी पंजाबी, कवी व पत्रकार जिजाबराव वाघ, रवींद्र पाटील, अरुण महाजन, सोपान चौधरी, लिलाधर पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी पांडुरंगाचा जयघोष करीत गजरही केला.

Web Title: Glory to Chalisgaonkar Warkaris who cycle Pandhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.