चाळीसगावला युवारंग महोत्सवाचा शानदार शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:12 PM2019-01-28T13:12:19+5:302019-01-28T13:13:39+5:30

बहिणाबाईंच्या स्मृतींना उजाळा

A glorious launch of the Uvarang Festival in Chalisgao | चाळीसगावला युवारंग महोत्सवाचा शानदार शुभारंभ

चाळीसगावला युवारंग महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Next

चाळीसगाव, जि. जळगाव : खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतींचा जागर करुन सोमवारी चाळीसगाव महाविद्यालयात सकाळी नऊ वाजता एरंडोल विभागाच्या आंतरमहाविद्यालयीन युवारंग महोत्सवाचे उदघाटन विद्यापीठाचे कुलसचिव बी.बी.पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग बोडार्चे चेअरमन नारायणदास अग्रवाल, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदा उन्मेष पाटील, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचीव डॉ. विनोद कोतकर, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. एम.बी.पाटील, अ‍ॅड. प्रदीप अहिरराव, मु.रा.अमृतकार, विश्वस्त मो.हु.बुंदेलखंडी, अ.वि.येवले यांच्यासह विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अनिल इंगळे, प्रा. नितिन बारी, प्रा. दीपक पाटील, सिनेट सदस्य दिनेश नाईक, नितिन झाल्टे, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख, प्रा.डॉ. सत्यजित साळवे, प्रा. विलास चव्हाण, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ. अजय काटे, प्रा.डॉ. प्रकाश बाविस्कर, एरंडोल विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. पंकजकुमार नन्नवरे आदी उपस्थित होते.
जात फिरवून झाला शुभारंभ
उमविचा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ असा नामविस्तार झाल्यानंतरचा प्रथम युवारंग महोत्सव चाळीसगावी होत आहे. महोत्सवात बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या कवितांमध्ये ग्रामीण संस्कृतीचे दर्शन होत असल्याने युवारंग महोत्सवाचे उदघाटन जातं फिरवून केले गेले. रंगमंचच्या डाव्या बाजूस बहिणाबाई चौधरी या जात्यावर धान्य दळत असल्याचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. सुगरणीचा खोपा, चुलीवर स्वयंपाक करणारी नऊवारीतील गृहिणी महोत्सवाचे खास आकर्षण ठरले. बहिणाबाईंच्या वेषभूषेतील प्रा. सावित्री राठोड यांच्या जात्यात मान्यवरांनी धान्य टाकून महोत्सवाचे उदघाटन केले. पुढील वषार्पासून विद्यापिठ स्तरावर विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच यावेळी बी.बी.पाटील यांनी केले. कला माणसाला जीवनावर प्रेम करायला शिकवते. त्यासाठी ध्येयाचा पाठलाग करा. असे संपदा पाटील यांनी सांगितले. चाळीसगावात प्रथमच युवारंग महोत्सव होतोयं. ही अभिमानाची बाब असल्याचे नारायणदास अग्रवाल यांनी नमूद केले.
महोत्सवासाठी सहा रंगमंच तयार करण्यात आले असून २१ महाविद्यालयातील ५०० युवा कलावंत सहभागी झाले आहेत. सुत्रसंचालन प्रा.डॉ. किरण गंगापुरकर यांनी केले. आभार प्रा. डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी मानले.

Web Title: A glorious launch of the Uvarang Festival in Chalisgao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.