पुरस्कार दिल्याने काम करण्याची जबाबदारी चौपट वाढते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:01+5:302021-09-14T04:19:01+5:30
येथील राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. तालुक्यातील जि. प. प्राथमिकचे ३२ शिक्षक व जिल्हा पातळीवरील ...

पुरस्कार दिल्याने काम करण्याची जबाबदारी चौपट वाढते
येथील राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. तालुक्यातील जि. प. प्राथमिकचे ३२ शिक्षक व जिल्हा पातळीवरील २ शिक्षकांना तसेच ४ शाळांना आदर्श शाळा म्हणून गौरविण्यात आले. याप्रसंगी जि. प. सदस्य मधुकर काटे, सभापती वसंत गायकवाड, उपसभापती अनिता चौधरी, विद्यमान सदस्य सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, विस्ताराधिकारी समाधान पाटील, सरोज गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, गोविंद शेलार, विजय पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले. तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार्थी मनोगत शिक्षिका ज्योती महालपुरे, पुष्पलता पाटील कृष्णा तपोने, अरुणा उदावंत यांनी व्यक्त केले. गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी शाळा ही गावाचा आरसा असते. गाव व शाळा यांचा समन्वय, शिक्षकांचे प्रेरणादायी कार्य, वृक्षारोपण, १६ कलमी कार्यक्रम याबाबत मनोगतात सांगितले.
ग्रामविकास विभाग योजनेतील उत्तम काम करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये वाणेगाव, पहाण, भोकरी या ग्रा. पं.चा सन्मान केला. बीटस्तरीय आदर्श शाळांमध्ये जि. प. शाळा निपाणे, जि. प. शाळा गोराडखेडा, जि. प. शाळा म्हसास, जि. प. शाळा राजुरी या शाळेचा गौरव केला. २०२० चा जि. प. स्तरावरील आदर्श शिक्षक किशोर अभिमन पाटील (वडगाव बु.), २०२१चा पुरस्कार सुभाष संतोष देसले (चिंचपुरे) यांचा सन्मान केला.
तालुकास्तरीय आदर्श शिक्षकांचा सत्कार
पंकज राधेश्याम पालीवाल-शहापुरा, भास्कर दिलीप वानखेडे-लासगाव, गायत्री सुभाष पाटील-वडगाव हडसन, मनोज भिकन दुसाने-वडगाव खुर्द, भिकन श्रावण अहिरे होळ, नयना भिला पाटील-नेरी, अनिल बापुराव वराडे-पुनगाव, पुष्पलता आनंदराव पाटील-कृष्णराव नगर, ज्योती शशिकांत महालपुरे-तारखेडा बु।, पुरुषोत्तम ज्ञानेश्वर पाटील-मोहाडी, मुकुंद अण्णासाहेब कडूस-पिंपळगाव तांडा, सुभाष गंभीर पाटील-सातगाव तांडा, कुमुदिनी महारू देवरे-वरखेडी, राजू रफिद पटेल-आंबेवडगाव, सय्यद करीम सय्यद मोहम्मद अली-कुऱ्हाड ऊर्दू, अनिल भगवान जाधव-माहिजी.
सन २०२०चे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार : प्रवीण आत्माराम पाटील-दुसखेडा, कृष्णा आत्माराम तपोने-लोहारा कन्या, स्वाती दौलतराव पाटील-नांद्रा, साहेबराव बळीराम पाटील-पहाण, विजया भालचंद्र पाटील-बाळद, हिलाल अण्णा पाटील-निपाणे, कैलास पुंडलिक पाखले-खाजोळे, वैशाली दामोदर पाटील -अंतुर्ली खु।, मीना लीलाधर हिवरे-पाचोरा कन्या क्र.१, स्वप्निल विजयसिंग पाटील -सारोळा, कल्पना तुकाराम पाटील-बिल्दी,नवल भीमराव ठोंबरे-वडगाव कडे, महेश दिनकर सोनवणे-गहुले, संजय रामदास पद्मे-सावखेडा खुर्द, नारायण मांगो राठोड-नाईकनगर, मो.सलाउद्दीन मो. गौस- सातगाव डोंगरी ऊर्दू.
सूत्रसंचालन किशोर पाटील व स्वाती पाटील यांनी केले.