संत सावता माळी शिक्षण संस्थेला जागा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:18+5:302021-06-26T04:12:18+5:30
धरणगाव : शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. ...

संत सावता माळी शिक्षण संस्थेला जागा द्या
धरणगाव : शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. परंतु पालिका प्रशासनाने संस्थेला अंधारात ठेवून बांधकाम सुरू केले आहे. बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलात शाळेसाठी एक मजला आरक्षित करावा किंवा संस्थेला दुसरी जागा द्यावी. अन्यथा आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय महाजन यांनी दिला आहे.
तर या जागेबाबत लवकरच पुराव्यासकट मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचेही ॲड. महाजन यांनी सांगितले आहे.
शहरातील मध्यवर्ती भागातील झुमकराम सार्वजनिक वाचनालयाच्या जागेतील दोन गट संत सावता माळी शिक्षण संस्थेसाठी आरक्षित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने संबंधित जागा भाडेतत्वावर देण्याचा ठरावही पालिकेत मंजूर झाला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने व्यापारी संकुलातील एक संपूर्ण मजला शाळेसाठी राखीव करावा. अन्यथा शाळेला पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी संस्थेने केली होती. परंतु मागणी फेटाळून लावत पालिका प्रशासनाने बांधकाम सुरूच ठेवेले आहे. एवढेच नव्हे तर बांधकामाला स्टे मिळू नये म्हणून न्यायालयात आधीच कॅव्हेट करून ठेवली आहे. परंतु शिक्षण संस्थेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. न्यायालयासह रस्त्यावरदेखील आम्ही हक्काची लढाई सुरू करू, असा इशारा देण्यात आला आहे.