कोविडमुळे मृत शिक्षकांना सानुग्रह अनुदान त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST2021-05-09T04:16:41+5:302021-05-09T04:16:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन आढावा बैठक नुकतीच राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली ...

कोविडमुळे मृत शिक्षकांना सानुग्रह अनुदान त्वरित द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन आढावा बैठक नुकतीच राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात शिक्षकांच्या समस्या मांडून त्यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला राज्य समन्वयक नितीन चौधरी, अजित चव्हाण, नाशिक विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण, उर्दू विभागाचे प्रमुख इलियास शेख आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बैठकीत सहभागी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच कोविड महामारी दरम्यान कर्तव्य बजावताना मयत झालेले अनेक प्राथमिक, माध्यमिक, मनपा, आश्रमशाळा शिक्षक यांना सानुग्रह अनुदान त्वरित मिळावे, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० सुधारित आश्वासित प्रगती योजना व रजा रोखीकरण लाभ शिक्षकांना मिळावा, सी. एम. पी. वेतन प्रणाली लागू करावी, पोलीस विभागाप्रमाणे वैद्यकीय बिलांसाठी कॅशलेस योजना सुरू करावी, बदलीच्या शासन निर्णयात विविध योग्य सुधारणा करून शुद्धीपत्रक काढण्यात यावे, पदोन्नतीने सर्व रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत व इतर प्रलंबित समस्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मांडल्या.
यांचा होता बैठकीत सहभाग
या ऑनलाईन आढावा बैठकीतील चर्चेत प्राथमिक शिक्षक सेना अध्यक्ष नरेंद्र सपकाळे, सरचिटणीस नाना पाटील, राज्य प्रतिनिधी महेंद्रसिंग पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप पवार, कोषाध्यक्ष टिकारामसिंग पाटील, माध्यमिक शिक्षक सेना अध्यक्ष नंदकुमार पाटील, कार्याध्यक्ष गोविंदा पाटील, रावेर विभाग अध्यक्ष विनोद गायकवाड, पारोळा तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, धरणगाव तालुकाध्यक्ष रमेश बोरसे, चोपडा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष विजय निकम, पाचोरा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष सचिन सरकटे, यावल तालुकाध्यक्ष संदीप पाटील, रावेर अमळनेर माध्यमिक तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, बोदवड माध्यमिक तालुकाध्यक्ष संदीप तायडे, विजय पाटील, नीळकंठ चौधरी, घनशाम निळे व इतर पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी राज्यस्तरावरील विविध प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.