टोल नाक्यावर भूमिपुत्रांना काम देऊन न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:37+5:302021-09-23T04:19:37+5:30
23RMM०९ टोल नाक्यावर भूमिपुत्रांना काम देऊन न्याय द्या जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची मागणी भुसावळ : शहराच्या हद्दीतील ...

टोल नाक्यावर भूमिपुत्रांना काम देऊन न्याय द्या
23RMM०९
टोल नाक्यावर भूमिपुत्रांना काम देऊन न्याय द्या
जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची मागणी
भुसावळ : शहराच्या हद्दीतील अनेकांनी आपल्या शेतजमिनी महामार्ग चौपदरीकरणासाठी दिल्या. मात्र, स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना डावलून परप्रांतीयांसह इतर जिल्ह्यातील नागरिकांना टोल नाक्यावर काम देण्यात येत आहे. हा स्थानिकांसोबत अन्याय असून, टोल नाक्यावर भूमिपुत्रांना काम द्यावे व टोल नाक्याच्या २० किलोमीटर परिसरातील वाहनधारकांना टोल माफी द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या व्यवस्थापकांकडे देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष विवेक नरवाडे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष इस्माईल गवळी, युवक काँग्रेसचे नितीन पटाव, खान्देश ठेवीदार संघटनेचे प्रवीण पाटील, भुसावळ काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष सागर कुरेशी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.