रेशनवर खाद्य तेल द्या, रिपाईंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:16 IST2021-04-10T04:16:19+5:302021-04-10T04:16:19+5:30

जळगाव : सध्या बाजारात खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात सर्वसामान्य, कष्टकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. ...

Give edible oil on rations, demand Rs | रेशनवर खाद्य तेल द्या, रिपाईंची मागणी

रेशनवर खाद्य तेल द्या, रिपाईंची मागणी

जळगाव : सध्या बाजारात खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यात सर्वसामान्य, कष्टकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकानांवर कमी दराने खाद्य तेल उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे यशवंत घोडेस्वार, गौतम सपकाळे, राजु सपकाळे, वासुदेव कुकरेजा यांनी केली आहे.

इच्छादेवी ते डी-मार्ट रस्त्याचे काम पुर्ण करा

जळगाव : इच्छादेवी चौफुली ते डी-मार्ट या रस्त्याचे काम पुर्ण करण्याची मागणी आरपीआयचे विभागीय कार्याध्यक्ष वासुदेव कुकरेजा यांनी केली आहे. या रस्त्याच्या कामाला काही दिवसांपुर्वी सुरूवात झाली होती. तसेच दुभाजकाचेही काम पुर्ण झाले आहे. मात्र हा रस्ताच खराब असल्याने तेथून वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे. या संदर्भात कुकरेजा यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले आहे.

Web Title: Give edible oil on rations, demand Rs