भुसावळ येथे गीता ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 17:14 IST2018-12-19T17:13:09+5:302018-12-19T17:14:29+5:30

भुसावळ शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिराच्या आराध्य प्रतिष्ठानातर्फे श्री गीताजयंती महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ७.३० वाजता काढण्यात आलेल्या भव्य अशा गीता ग्रंथ दिंडीने म्युनिसिपल पार्क भागातील रहिवाशांचे लक्ष वेधले गेले.

Gita Glandadindee focuses attention on Bhusaval | भुसावळ येथे गीता ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

भुसावळ येथे गीता ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

ठळक मुद्देश्री दत्त प्रभू अवतारदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमश्रीकृष्ण मंदिरात भाविकांची दर्शनार्थ गर्दी

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिराच्या आराध्य प्रतिष्ठानातर्फे श्री गीताजयंती महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ७.३० वाजता काढण्यात आलेल्या भव्य अशा गीता ग्रंथ दिंडीने म्युनिसिपल पार्क भागातील रहिवाशांचे लक्ष वेधले गेले.
गीता ग्रंथ दिंडी म्युनिसिपल पार्क भागातून नेण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
श्रीकृष्ण मंदिर आराध्य प्रतिष्ठानच्या वैशाली आराध्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी गीता ग्रंथ दिंडी खांद्यावर घेऊन मार्गक्रमण केले. श्रीकृष्ण मंदिरात समारोप झाला.
यानंतर सकाळी ९ ते ११ गीता पारायण करण्यात आले. दुपारी १२ वाजता आरती करण्यात आली. त्यानंतर सद्भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री गीता जयंती महोत्सवानिमित्त श्रीकृष्ण मंदिरात भाविकांची दर्शनार्थ मोठी गर्दी झाली होती. वैशाली आराध्य व सहकाºयांनी सेवा बजावली.
२१ डिसेंबर रोजी शुक्रवारी श्री दत्त प्रभू अवतार दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंचअवतार उपहार महोत्सव साजरा करण्यात येईल.

Web Title: Gita Glandadindee focuses attention on Bhusaval