विद्यार्थिनींच्या पंखांना मिळाले बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 15:26 IST2017-08-26T15:25:13+5:302017-08-26T15:26:45+5:30

पायपीट थांबली : ग्रामीण भागात मिळाल्या 30 सायकली भेट

The girls' wings got their strength | विद्यार्थिनींच्या पंखांना मिळाले बळ

विद्यार्थिनींच्या पंखांना मिळाले बळ

ठळक मुद्देव्हाटस्अपची मदत.. वापरात नसलेल्या सायकली वापरातआधारवड ट्रस्टतर्फे पुस्तके

सुहास शूर । 
लोकमत न्यूज नेटवर्क
जामदा ता.चाळीसगाव :  दिल है छोटासा. छोटीसी आशा, मस्तीभरे मनसे, भोलीसी आशा, चाँदतारो को, छुने की आशा, आसमानो मे, उडने की आशा.. आजच्या जमान्यातही रोज 4-6 कि.मी. पायपीट करीत उज्वल भवितव्याची पायाभरणी करणा:या सावित्रीच्या लेकींच्या चिमण्या पंखात उमेदीचे नवे बळ संचारल्याने त्यांचे मन असे या गिताप्रमाणे मोहरलेच पण चेहरेही 30 सायकलींच्या वाटपाने आनंदाने डवरुन निघाले.
माध्य. विद्यालय जामदे-रहिपुरी शाळेत भऊर- रहिपुरी-भवाळी या गावातून  रोज 4-6 कि.मी. पायपीट करीत विद्यार्थी येतात. याचा विपरित परिणाम विशेषत: विद्यार्थिनींच्या अभ्यासावर होत असे. 
विवेकानंद सेवा मंडळ डोंबिवली, जी.के. ट्रस्ट बांद्रा, संदीप येवले नाशिक यांनी या सावित्रीच्या लेकींना 30 सायकलींची मदत नुकतीच दिली. यामुळे विद्याथ्र्याचे कष्ट व श्रम कमी होणार आहेत.
व्हाटस्अपची मदत..
वापरात नसलेल्या सायकली वापरात
शहरातील दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जातात. त्यामुळे त्यांच्या सायकली घरीच पडून असतात. ही बाब हेरुन जामदा शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव ठोके यांनी व्हाटस्अप ग्रुपद्वारे  शाळेतील विद्याथ्र्याची रोजची  ससेहोलपट व शहरात पडून असलेल्या सायकलींचा मुद्दा मांडला. त्याला विवेकानंद सेवा मंडळ, जीके ट्रस्ट व संदीप येवले यांनी त्वरित प्रतिसाद देत 30 सायकली जमा करुन चाळीसगावी रवाना केल्या. आणखी 10-12 सायकलींची मदतही लवकरच मिळणार आहे.
आधारवड ट्रस्टतर्फे पुस्तके
आ.बं. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक के.डी.शिंपी व त्यांचे अमेरिकास्थित पुतणे सुशील शिंपी यांनी शाळेला 15 हजार रुपयाची विविध शैक्षणिक पुस्तके व स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिली.शाळेनेही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार असल्याचे मुख्याध्यापक ठोके यांनी सांगितले. 
लवकरच शाळेत कलरींग, डिजिटल शिक्षण, सीसीटीव्ही व इतर अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: The girls' wings got their strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.