ग्रामीण भागातूनही होऊ लागल्या मुली रफूचक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:27+5:302021-09-10T04:21:27+5:30
पाल, ता. रावेर : आपल्या कार्य-कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी चांगली वाढ झालीय, तशीच शाळकरी ...

ग्रामीण भागातूनही होऊ लागल्या मुली रफूचक्कर
पाल, ता. रावेर : आपल्या कार्य-कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी चांगली वाढ झालीय, तशीच शाळकरी वयात प्रेमात पडणाऱ्या व बऱ्याचदा चुकीचा निर्णय घेत बेजबाबदार तरुणासोबत पळून जात लग्न करणाऱ्या मुलींची संख्या ग्रामीण भागात वाढतच चालली आहे. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
प्रेमविवाह हा तरुणाईला भुरळ घालणारा शब्द असून गेली दोन दशके तर प्रेमविवाहाचा इतका उदोउदो होतोय की, अनेक पालकांना ‘तुम्ही काय करता?’मुला मुलीवर लक्ष ठेवता येत नाही का? असा प्रश्न ऐकून घेण्याची वेळ येत आहे.
शाळा व कॉलेज तसे सोशल मीडिया
मुळे होणारी तरुण व तरुणींची भेट ही पालकांसाठी तापदायक ठरत आहे. प्रत्येकाच्या घरात हायटेक मोबाइल असल्याने दिवसभर बोलणे सुरू असते. आई किंवा वडिलांनी विचारले तर मुलगी सांगते की, मैत्रिणीशी बोलतेय.
मात्र तिकडून मित्र बोलत असतो.
आणि काही दिवसातच मुलगी घरातून गायब होते व लग्न करीत थेट पोलीस स्टेशनला हजर होते.
आणि पोलीस स्टेशनमध्ये पालकांनी कितीही
डोकं आपटूनही मुलीचे किंवा मुलाचे मन परिवर्तन होत नाही.
पोलिसांचेही या बाबतीत हात बांधले असतात. असे प्रकार खूपच होत आहेत.
पाल परिसरातही या दोन वर्षात अशा प्रकारे रफूचक्कर होत लग्न केल्याच्या दहा ते अकरा
घटना घडल्याने आता पालकवर्ग खूपच चिंताग्रस्त झाला आहे. बऱ्याचदा पालक मात्र बदनामीच्या भीतीने पोलिसातही जात नाही. आदिवासी बहुल परिसरातील पाल, आभोडा, निमड्या, मोरव्हाल या गावांमध्ये या घटना घडल्या आहेत.