शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्याभरात निघालेली ती बालिका सापडली मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 21:13 IST

मुलीला सुखरूप पाहून कुटूंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव : चार दिवसांपूर्वी रागाच्याभरात घरातून निघालेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले. दरम्यान, बालिका जळगावात परल्यानंतर तिला सुखरूप पाहून तिच्या कुटूंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. अखेर एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीचे बालिकेच्या कुटूंबियांनी आभार मानले.वडिलांचे निधन झाल्यामुळे अल्पवयीन बालिका ही मास्टर कॉलनीत राहत असलेले काका यांच्याकडे राहत होती. १६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता ती दुध घेण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ होवून सुध्दा घरी न परतल्यामुळे तिची शोधाशोध कुटूंबियांनी केली होती. अखेर ती मिळून न आल्यामुळे काकाने पोलिसात धाव घेवून तक्रार दिली होती.आणि... आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून आला फोनगुन्हा दाखल होताच, एमआयडीसी पोलिसांनी बालिकेचा शोध सुरू केला़ एमआयडीसी पोलिसांना मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यातून फोन आला. आपल्या परिसरातील बालिका येथे असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मिलिंद सोनवणे, महिला पोलीस कर्मचारी मालती वाडीले, होमगार्ड धिरज भगत यांनी लागलीच पोलीस निरिक्षक यांनी मुंबईला रवाना केले. पथकाने मुंबई पोलीसांकडून खात्री करून त्या अल्पवयीन बालिकेला ताब्यात घेवून सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले.रागाच्याभरात निघून गेल्याचे सांगितले...एमआयडीसी पोलिसांनी बालिकेला पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिची चौकशी केली. चौकशीअंती तिने रागाच्याभरात घर सोडल्याचे समोर आले़ तसेच रेल्वेने ती मुंबईला गेली असल्याचेही बाब समोर आली़ त्यानंतर बालिकेला कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले. यासाठी पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील यांनी बालिकेला शोधण्यासाठी परिश्रम घेतले. तर यासाठी सामाजिक कार्यकर्ते इक्बाल पिरजादे आणि जिया बागवान यांचेही सहकार्य लाभले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव